Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तीव उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने तसेच, पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहराला तसेच, इतर भागांना पावसाळ्यापर्यंत म्हणजे जूनअखेरपर्यंत पुरेल इतका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणातून 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून दररोज 520 एमएलडी पाणी उचलले जाते. पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी संपूर्ण शहराला पुरवले जाते. एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी घेऊन शहरातील काही भागास पुरवले जाते. आंद्रा धरण पाणी योजनेअंतर्गत निघोजे येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाच्या झळा तीव होऊ लागल्याने शहर परिसराचा तापमानाचा पारा 41 अंशावर पोचला. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद या वेळी झाली आहे. वाढत्या झळांमुळे शहरवासीय पुरते हैराण झाले आहेत. आधीच उकाड्याने हैराण नागरिक उष्णतेची लाट ओसरण्याची वाट पाहत आहेत. सकाळी नऊ वाजताच उन्हाच्या काहिलीने नकोसे वाटत आहे. दहानंतर कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. नागरिकदेखील दुपारी कामे करणे शक्यतो टाळत आहेत. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. तापमान 38 ते 40 अंशाच्या दरम्यान असल्याने दुकानचालकदेखील उकाड्याने दुपारी दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. शनिवारी तापमानाने उच्चांक…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी ८ एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेल्या ‘पब्लिक सायकल शेअरिंग’ या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी सकाळच्या व्यायामासाठी व फिटनेससाठी मंथली सबस्क्रिप्शन घेतले. मात्र, उपक्रम सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच सायकल स्टँड वेळेवर उघडला जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. सकाळी लवकर सायकल राईडसाठी येणाऱ्या नागरिकांना साडेसात वाजेपर्यंत ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरत होते आणि या चांगल्या उपक्रमाबद्दल नाराजी वाढत होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या कु. संजीवनी पुराणिक यांनी तात्काळ नगरसेविका डॉ. कुंदा भिसे तसेच चिंचवड विधानसभेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माहिती तंत्रज्ञान नगरी (आयटी हब) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि लगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी वाहतूक कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरात पावसाळ्यापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह महानगर आयुक्तांनी शनिवारी (२५ एप्रिल) या भागाचा सविस्तर पाहणी दौरा केला. मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, भूगाव आणि पिरंगुट या पट्ट्यात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण नालेसफाईमुळे नागरिकांना दरवर्षी मोठा मनस्ताप…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी तसेच अशी परिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उप आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून तर अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पावसामुळे शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे रक्षण करणे आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर…

Read More

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रशिक्षण केंद्रास भेट जनगणना मोहिमेला वेग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या जनगणना प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज ड क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २६ मधील कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा येथे आयोजित प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन प्रशिक्षण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार तसेच चार्ज अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे उपस्थित होते. आयुक्तांनी प्रगणक, पर्यवेक्षक आणि फील्ड ट्रेनर्स यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाची गुणवत्ता, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर पिंपरी-चिंचवड शहरातून जोरदार जनसमर्थन उमटताना दिसत आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेल्या या चळवळीला शहरातील विविध समाजघटकांनी अभूतपूर्व, ठाम आणि लढाऊ पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात विविध समाजांच्या प्रतिनिधींची व्यापक आणि दिशादर्शक बैठक पार पडली. या बैठकीस सुमारे 300 ते 350 प्रतिनिधी विविध समाजातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती केवळ संख्यात्मक नसून सामाजिक प्रश्नांविषयीची जागरूकता, अस्मिता आणि न्यायासाठी लढण्याची तयारी दर्शवणारी ठरली. बैठकीत उपवर्गीकरणाचा मुद्दा हा केवळ धोरणापुरता मर्यादित नसून, सामाजिक समता, हक्कांचे न्याय्य पुनर्वाटप आणि ऐतिहासिक अन्याय दुरुस्तीचा मूलभूत प्रश्न…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पूर्वीप्रमाणेच बोनस व रजेचे वेतन दरमहा अदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औद्योगिक संबंध विभागाने दि. २१ एप्रिल २०२६ रोजी परिपत्रक काढून ही सुधारित पद्धत लागू केली. या निर्णयामुळे राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमधील हजारो कंत्राटी कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील बोनस व रजेचे वेतन एकत्रितपणे ऑक्टोबर २०२६ मध्ये देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) व…

Read More

​पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस आक्रमक; काळेवाडीत सरकारविरोधात जोरदार निदर्शने ​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘महिला आरक्षण विधेयक २०२३’ मंजूर होऊनही केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) काळेवाडी येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. “महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजप स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून, हा महिलांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दांत शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी सरकारवर प्रहार केला. ​अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा आणि प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळेवाडी येथे पार पडले. यावेळी मनोज कांबळे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विषय सखोल पुनर्निरीक्षण शिबिर (SIR Process)’ ला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या विशेष प्रयत्नातून शनिवार दि. १८ एप्रिल व रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांच्या मतदार नोंदणीशी संबंधित माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. बी.एल.ओ. शिक्षक व शिक्षिका यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपस्थित नागरिकांचे मॅपिंग ऑनलाईन मोबाईलद्वारे करून घेतले. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे नागरिकांनी सांगितले. शिबिराच्या आयोजनामुळे मतदार…

Read More