चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विषय सखोल पुनर्निरीक्षण शिबिर (SIR Process)’ ला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या विशेष प्रयत्नातून शनिवार दि. १८ एप्रिल व रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरामध्ये नागरिकांच्या मतदार नोंदणीशी संबंधित माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. बी.एल.ओ. शिक्षक व शिक्षिका यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपस्थित नागरिकांचे मॅपिंग ऑनलाईन मोबाईलद्वारे करून घेतले. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
शिबिराच्या आयोजनामुळे मतदार याद्यांमध्ये अचूकता येण्यास मदत होणार असून, भविष्यातील निवडणूक प्रक्रियेसाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी प्रशासन व निवडणूक अधिकारी मनोज लोणकर, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका मनिषा चिंचवडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संघटन मंत्री मधुकर बच्चे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, माजी नगरसेविका कांताबाई मोंढे, तसेच योगेश चिंचवडे यांच्यासह मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुयोग्य नियोजन व लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे हे शिबिर यशस्वी ठरले असून, मतदार नोंदणी प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

