चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

सायन्स पार्कमध्ये आलेल्या प्रेक्षकांनी घेतला शून्य सावलीचा दुर्मिळ अनुभव 

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड परिसरात शून्य सावली  दि. १३ व १४ मे २०२५    या खगोलीय घटनेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये भेटीस आलेल्या प्रेक्षकांसाठी सायन्स पार्क तर्फे विशेष कार्यक्रम व शून्य सावली अवलोकनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सर्वसाधारणतः या खगोलीय घटनेचा अनुभव आपल्याला वर्षातून दोन वेळा घेता येतो. अर्थात या घटनेच्या वेळेस पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष सूर्याभोवती फिरण्याच्या प्रतलाकडे जास्तीत जास्त २३.५ अंश या सर्वोच्च बिंदूवर येत असताना वर्षातून दोन वेळा म्हणजे उत्तरायन आणि दक्षिणायन दरम्यान सूर्य मध्यान्हाला बरोबर आपल्या डोक्यावर येत असतो. गमतीची गोष्ट अशी की या घटनेच्या वेळेस आपली स्वतःची सावली सुद्धा दिसत नाही. या घटनेचा प्रत्यय प्रेक्षकांनी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे घेत असताना शून्य सावलीचे निरीक्षण कसे करावे, या घटनेचे दैनंदिन जीवनात खगोलीय महत्व प्रश्नोत्तरे च्या माध्यमातून व सहज करता येणा-या प्रयोगातून मुलांनी व प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे आणि उत्सुकतेने स्वतः अनुभवले. जागतिक तारांगण दिन तसेच पिंपरी चिंचवड तारांगणाचा द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांबरोबरच या अविस्मरणीय घटनेचा आनंद मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी घेतला.
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button