Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद नढे यांनी झंझावती प्रचार करत राजकीय वातावरण पूर्णतः तापवले आहे. “नाद घुमू दे, कमळ फुलू दे” या घोषणांनी समर्थ कॉलनी, गणेश कॉलनी आणि साई कॉलनी परिसर दणाणून गेला असून, भाजपच्या प्रचारात उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे.

विनोद नढे यांनी समर्थ, गणेश व साई कॉलनीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पदयात्रा, घराघरांत संपर्क आणि कोपरा सभा घेत थेट मतदारांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत विविध नागरी प्रश्न, प्रलंबित विकासकामे आणि मूलभूत सुविधांबाबत आपली मते मांडली. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन तसेच महिलां-युवकांसाठीच्या सुविधांवर नढे यांनी ठोस भूमिका मांडत विकासाचा अजेंडा समोर ठेवला.

“राजकारण सेवा करण्यासाठी असते, दबाव किंवा भीती निर्माण करण्यासाठी नाही,” असा स्पष्ट संदेश देत विनोद नढे यांनी सकारात्मक आणि विकासकेंद्रित प्रचारावर भर दिला. त्यांच्या प्रचारात भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला आघाड्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. शिस्तबद्ध संघटन, घोषणांचा नाद आणि कमळ चिन्हाभोवती एकवटलेली ताकद प्रभाग २२ मध्ये भाजपची भक्कम स्थिती दर्शवत आहे.
समर्थ, गणेश आणि साई कॉलनीतील नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता भाजपच्या प्रचाराला निर्णायक वळण मिळत असल्याचे चित्र आहे. “प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य” हा आपला संकल्प असल्याचे विनोद नढे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

झंझावती प्रचार, संघटनात्मक बळ आणि जनसमर्थनाच्या जोरावर प्रभाग २२ मध्ये भाजपचा कमळ फुलण्याची शक्यता अधिक बळावत असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version