ताज्या घडामोडीपिंपरी

श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या स्वरा जाधव विद्यार्थिनीने मिळवले यश

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड च्या विकास शिक्षण मंडळं संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या इ 5 वी च्या    कु स्वरा नामदेव जाधव   या विद्यार्थिनीने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 मध्ये  उत्कृष्ट कामगिरी केली.

कु स्वरा नामदेव जाधव इ 5 वी हिने पुणे येथे झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान 2025 परीक्षेमध्ये राज्यात 42 वा तर जिल्ह्यात 37 वा तर केंद्रवर 4 था क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव , उपाध्यक्ष  अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले.

तसेच विद्यालयाच्या वतीने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  पुष्पा शिंदे , माध्यमिक उपमुख्याध्यापिका  सुषमा संधान, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक साहेबराव देवरे कोर कमिटी सदस्य छाया ओव्हाळ,  मनीषा जाधव यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button