ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शनिवारी (दि 7). आई सविता, वडील मनोहर आणि भाऊ व पती यांच्यासह सोनाली कुलकर्णी यांनी गणरायाला निरोप दिला.
दरवर्षी सोनाली कुलकर्णी या आकुर्डीतील गणेश तलाव येथे दरवर्षी गणेश विसर्जन करत असतात. मात्र त्यांनी या वर्षी पर्यावरणपूरक शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.
विसर्जनाच्या दिवशी शनिवारी कुटुंबियांसमवेत गणरायाला निरोप दिला.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ”पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.














