चिंचवडताज्या घडामोडी
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ढोल-ताशा आणि लेजर-शोसह डीजेचा दणदणाट… ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात आणि उत्साह व भावपूर्ण वातावरणात चिंचवड परिसरातील मंडळांच्या गणरायांच्या मूर्तीचे शनिवारी(दि.6) विसर्जन करण्यात आले.
चिंचवड येथील चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापालिकेच्या वतीने परिसरातील विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा आणि झांज पथकाच्या दणदणाटासह बहुतांशी मंडळांनी ‘डीजे’चाही वापर केला. अनेक मंडळांच्या मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर कार्यकर्ते नृत्याचा आनंद घेत होते. रात्री उशिरापर्यंत परिसरातील गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू होती.
पहिलं मंडळ 5.10 मि. वाजता अजिंक्य मित्र मंडळ.
गांधीपेठ मित्र मंडळ चिंचवडगाव, उत्कृष्ट मित्र मंडळ भोई आळी चिंचवडगाव, गावडे कॉलनी संस्कृती मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, नव तरुण मित्र मंडळ, गावडे पार्क मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, आणि शेवटचा गणपती विसर्जन मोरया गोसावी क्रिडांगण केशवगरचा रात्री 11 वाजून 55 मि. शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. एकूण ३० मंडळानी स्वागत कक्षातून सत्कार स्विकराला.तब्ब्ल साडे सात चिंचवड गणपती विसर्जन मिरवणूक चालली.




















