राजेंद्र जगताप यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ३५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
नवी सांगवीतील सुरुची हॉटेल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल व युवक अध्यक्ष शेखर काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे शहाराध्यक्ष विजूअण्णा जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, आयोजक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सुषमा तनपुरे, स्मिता भोसले, शोभा पगारे, संदीप राठोड, ॲड. अभिषेक जगताप, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, सतीश चोरमले, डॉ. महादेव रोकडे, पंकज मालविय, नंदकुमार कटारे, धम्मराज गायकवाड आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरातील सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तू देण्यात आली. भोसरी येथील संजीवनी ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.
दरम्यान, रक्तदान शिबिराला माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सुनील कदम, सुनील इंगळे, अर्जुन शिंदे, गणेश बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप, ईश्वर काटे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, गणेश जगताप, पवन साळुंखे यांनी भेट देत रक्तदात्यांशी संवाद साधला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रशांत म्हाळसकर, नारायण सूर्यवंशी, निखिल जगदाळे, शैलेश शहा, उदय ववले, सचिन शेलार, बाळासाहेब पिल्लेवार, राजेंद्र कोतवाल, अतुल ससाणे, नितीन कोले, अजिंक्य जाधव, आनंद दिवेकर, विलास वेळेकर, अजय जगदाळे, किशोर जगधने, दिलीप कांबळे, सुदाम शिंदे, कृष्णा सातपुते यांनी परिश्रम घेतले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे उदघाट्न :
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या प्रयत्नातून नवी सांगवीतील साईराज रेसिडेन्सी येथे नव्याने उभारलेल्या साईराज ज्येष्ठ नागरिक संघाचे उदघाट्न शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी वाचनालय सुरू करण्यात आले असून, ज्येष्ठ नागरिकांना सर्व वृत्तपत्रे एकाच ठिकाणी वाचायला मिळणार आहेत. नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.













