ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित

राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

Spread the love

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राज्य निवडणूक आयोगाने आगामी नियोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश ’ वर्ग महापालिकेत असूनया महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

 राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात महानगरपालिका सदस्यनगरपरिषद / नगरपंचायतजिल्हा परिषदपंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महापालिका आणि ’ वर्गामध्ये येणाऱ्या पुणे व नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तर ’ वर्गामध्ये येणाऱ्या पिंपरी चिंचवडनाशिक व ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय ’ वर्गामध्ये येणाऱ्या कल्याण-डोंबिवलीनवी मुंबईछत्रपती संभाजीनगर व वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ११ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली असून, ‘’ वर्गामध्ये येणाऱ्या उर्वरित १९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ९ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब वेळोवेळी सादर करणे बंधनकारक राहीलअसेही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button