ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सेवा हक्क दिनानिमित्त २८ एप्रिलला विविध उपक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त राज्य शासनाने घेतला निर्णय

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने राज्यात २८ एप्रिल रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त शहरात प्रशासन सेवेत नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेवा हक्क दिनानिमित्त शहरातील नागरिकांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५, राज्य सेवा हक्क आयोग व आपले सरकार या पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध सेवांचा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधीना या अधिनियमाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये सेवा हक्क अधिनियम व आपले सरकार पोर्टल या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सोशल माध्यमांवर देखील नागरिकांमध्ये सेवा हक्का बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

यामध्ये उपक्रमांमध्ये मुख्य प्रशासकीय कार्यालयांसह इतर कार्यालयांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्त सेवेची बांधिलकी मानणारी शपथ अधिकारी वर्गा देण्यात येणार आहे. महापालिकांच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे आरोग्य विभागातील आय ई सी टीम मार्फत गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे येथे सेवा हक्क नियमांचे फलक घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील नागरिक भागांमध्ये पथनाट्याद्वारे सेवा हक्काबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच समाज विकास विभागाच्या वतीने झोपडपट्टी व बचत गट यांच्यामध्ये समूह संघटकामार्फत सेवा हक्क अधिनियमाची माहिती देण्यासाठी मेळावे व बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमांमध्ये महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन शासन राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी. आपल्या सेवा हक्का हक्काबाबत जागरूक व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार २८ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात सेवा हक्क दिन साजरा केला जाणार आहे. यामध्ये शहरातील नागरिकांनी या सेवेविषयी जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी. व ऑनलाईन सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे. व विद्यार्थ्यांनी सेवा हक्क ऑनलाईन सेवेबद्दल निबंध लिहून राज्य शासन राबवत असलेल्या उपक्रमात सहभागी व्हावे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button