क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” – हे ब्रीद वाक्य देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एक प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. हे पुष्पांजली अर्पण शाळेच्या आदरणीय शिक्षिका स्वाती वक्टे व गीतांजली दुबे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी भावना रायका, तसेच शिक्षिका मोनिका भाजीभाकरे आणि सारिका देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपुढे मांडली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तेजश्री महाले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानण्याची भूमिका स्वाती वक्टे यांनी पार पाडली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत होऊन इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.













