Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातासंदर्भात स्वतः अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबतची माहिती दिली आहे. या अपघातात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी सुखरूप असल्याचे त्यांनी कळवले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोशाल मिडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज पुण्याहून मुंबईकडे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी जात असताना माझ्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने मी आणि माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत.

माझ्या काळजीपोटी कॉल आणि मेसेज करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो. मी पूर्णपणे सुखरूप असून, नेहमीप्रमाणे तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.”

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version