जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान; अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान; अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरात जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. औध येथील जिल्हा रुग्णालय आणि सांगवी महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिसेविका मंगला जाधव यांना प्रतिष्ठित फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडच्या महापौर ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सांगवी पिंपळे गुरव मंडल अध्यक्ष गणेश ढोरे,
डॉ. देविदास शेलार, जवाहर ढोरे, प्रमोद ठाकर, हिरेन सोनवणे आणि संदेश धामणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुग्णांची सेवा अविरतपणे करणाऱ्या परिचारिकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. परिचारिकांच्या योगदानाला समाजाने नेहमीच आदराने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.













