ताज्या घडामोडीपिंपरी

विरोधकाच्या रचनात्मक मांडणीचे स्वागत करणारे पंतप्रधान म्हणजे नेहरू – काशिनाथ नखाते

Spread the love

पंडित नेहरूमुळे देश प्रगतीपथावर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधुनिक भारताचा अचंबित करणारा यशस्वी प्रवास नेहरू यांच्या विशाल दृष्टीनेच घडला आहे. धर्मनिरपेक्ष, स्वातंत्र्य ,समता आणि प्रतिष्ठा याप्रति न्याय व मूल्यांना बांधील असे कायद्याने नियंत्रण केलेला लोकशाही देश ही भारताविषयी त्यांची संकल्पना होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपला ठसा उमटवला . आज देशभरात विरोधी पक्षाचे महत्त्व कमी करणे व त्यांना संपवण्याच्या काळामध्ये नेहरू आठवतात. लोकशाहीत विरोधी पक्षाला ते अधिक महत्त्व देत असत त्यांची मते जाणून घेत होते रचनात्मक विरोधकाचे त्यांनी स्वागतच केले केले आणि त्यांना प्रोत्साहन देत राहिले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, बांधकाम कामगार समिती, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजेश माने, सुनील भोसले,सलीम डांगे, महादेव गायकवाड,प्रदीप गावंडे, संजय मधाळ, वर्षा माने, गीता सूर्यवंशी, रेखा वाघमारे, स्वाती लंघे, उषा भोसले यावेळी आदीसह कामगार उपस्थित होते .

नखाते म्हणाले की,आयआयटी, एम्स सारख्या संस्था निर्माण करून देशाला आत्मनिर्भार करणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दुरगामी विचार व कृतीमुळे देश प्रगतीपथावर आहे . पंतप्रधान म्हणून त्यांनी उभे केलेली कामे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील महानतेची देशाला आजही जाणीव आहे निस्वार्थी वृत्ती, लोकशाहीवादी स्वभाव विनम्रता यामुळे देशासह जगात त्यांचा नावलौकिक राहिला आज विरोधकांना ने स्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आजच्या परिस्थितीमध्ये नेहरूजींच्या उदात्त विचारांची देशाला आठवण होते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button