चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या ध्रुव सपलिगा याला SOF Olympiad-IMO परीक्षेत सुवर्ण पदक

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमधील बारावीचा विद्यार्थी ध्रुव सपलिगा याने SOF Olympiad-IMO (International Mathematics Olympiad) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे ध्रुवने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७२ वा क्रमांक तर महाराष्ट्र झोनमध्ये प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा आणि राज्याचा मान उंचावला आहे.
ही परीक्षा संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयातील प्राविण्य व बुद्धीकौशल्य तपासण्यासाठी घेतली जाते. ध्रुवने आपले उत्तम गणितज्ञान, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीमुळे ही कामगिरी साध्य केली.
या शैक्षणिक वर्षात ७२ देशांमधील ९६,४९९ शाळांमधून कोट्यवधी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्या स्पर्धेतून ध्रुवने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ध्रुव ला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप :
•SOF -IMO झोनल गोल्ड मेडल.
•रोख पारितोषिक – ५००० रु.
•झोनल एक्सलसचे प्रमाणपत्र.
ध्रुवच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल शाळेचे संचालक श्री. संदीप काटे सर यांनी ध्रुव व त्याच्या पालकांचा बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुख्याध्यापिका सुविधा महाले आणि जुनिअर कॉलेज च्या विभाग प्रमुख शर्वरी कट्टी व उपस्थित शिक्षकांनी ध्रुवचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ध्रुव ने बोलताना त्याच्या यशामध्ये शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व पालकांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.













