Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»सार्वजनिक वाहतूक पर्याय म्हणून बीआरटीएस कॉरिडॉर ठरत आहेत उपयुक्त
ताज्या घडामोडी

सार्वजनिक वाहतूक पर्याय म्हणून बीआरटीएस कॉरिडॉर ठरत आहेत उपयुक्त

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर क्षेत्रातील ११ लाख पीएमपीएमएल प्रवाशांपैकी सुमारे २२ टक्के प्रवासी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटीएस कॉरिडॉरचा वापर करीत आहेत. पीएमपीएमएलच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या बीआरटीएसमार्फत दररोज २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे ही सेवा पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा ठरली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये सध्या निगडी-दापोडी, दिघी-आळंदी, सांगवी-किवळे, काळेवाडी-चिखली आणि नाशिक फाटा-वाकड असे पाच बीआरटीएस कॉरिडॉर कार्यरत आहेत. हे कॉरिडॉर शहराच्या पूर्व – पश्चिम व उत्तर – दक्षिण भागांतील महत्त्वाच्या जवळपास १११ मार्गांना जोडतात. त्यामुळे ही सेवा एकप्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक रचनेचा कणा ठरत आहेत. शहरातील अंदाजे सुमारे ९६ टक्के लोकसंख्या बस थांब्याच्या ५०० मीटर अंतरात राहते. बीआरटीएसच्या स्वतंत्र मार्गिका आणि प्रवाशांची गर्दी असणाऱ्या वेळेत बसची दीड ते सहा मिनिटांच्या फ्रीक्वेन्सीमुळे प्रवासाचा वेळ कमी होत असल्याने प्रवाशांकडून ही सेवा वापरण्यात प्राधान्य दिले जात आहे. तसेच बसला गर्दी होत असल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे.

वाहतूक सेवेची क्षमता वाढवली जाणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक वाहतूक ताफ्यात वाढ करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. विविध योजना आणि खरेदी मोहिमांद्वारे एकूण 2,400 बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जात आहेत. यामध्ये पीएमपीएमएलने आधीच खरेदी केलेल्या 400 नवीन सीएनजी बसांचा समावेश आहे, तसेच पीएमआरडीएकडून 500 बस आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या सहाय्याने आणखी 500 बस उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या योजनांतून आणखी 1,000 बस मिळण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरांनी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत चालण्यासाठी २०३१ पर्यंत ८ हजार १०० बसेस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिनेही नियोजन करण्यात येत आहे.

 

कॉरिडॉरनुसार अशी सुरू आहे सेवा

निगडी–दापोडी कॉरिडॉर : दररोज एकूण बस फेऱ्या १ हजार ८०० पेक्षा जास्त, तर प्रवाशांची संख्या ९० हजारांपेक्षा जास्त.

दिघी-आळंदी कॉरिडॉर : दररोज एकूण बस फेऱ्या १ हजार १०० पेक्षा जास्त, तर प्रवाशांची संख्या ६५ हजार ८०० पेक्षा जास्त.

सांगवी-किवळे कॉरिडॉर : दररोज एकूण बस फेऱ्या १ हजार १०० पेक्षा जास्त, तर प्रवाशांची संख्या ५९ हजार ५०० पेक्षा जास्त.

काळेवाडी–चिखली कॉरिडॉर : दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त.

नाशिक फाटा-वाकड कॉरिडॉर : दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १० हजार ६०० पेक्षा जास्त.

पाच कॉरिडॉरवर मिळून दररोज होणाऱ्या एकूण बस फेऱ्या सुमारे ४ हजार ६०० व एकूण प्रवासी संख्या २ लाख ४५ हजार

पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहता बीआरटीएस सेवा ही आपल्या शहरासाठी अत्यावश्यक सेवा आहे. लाखो लोक दररोज या सेवेचा लाभ घेत असून सर्वांना परवडणारी व विश्वासार्ह ही वाहतूक सेवा आहे. आगामी काळात बीआरटीएस कॉरिडॉरचा विस्तार करणे आणि बसेसची संख्या वाढवणे यावर भर देऊन सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

बीआरटीएस खूप जागा व्यापते, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी वेगळं चित्र दाखवत आहे. निगडी–दापोडी मार्गावर फक्त १५ टक्के रस्त्याच्या जागेचा वापर बीआरटीएस करत असून प्रत्येक तासाला येथे सुमारे ५ हजार ६०० प्रवासी सेवेचा लाभ घेत आहे. तर मिश्र वाहतुकीसाठी असणाऱ्या ५२ टक्के रस्त्यावर केवळ ७ हजार २०० प्रवाशांची वाहतूक होते. या आकडेवारीवरून बीआरटीएसची कार्यक्षमता दिसून येते.
– बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर एम.डी./एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर
Next Article डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.