आळंदीत रात्रीस खेळ चाले मुख्याधिकारी रात्री अचानक पाहणी दौऱ्यावर, आळंदी मुख्याधिकारीं माधव खांडेकर यांची जलशुद्धीकरण केंद्रास अचानक भेट
स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यावर विशेष लक्ष ; कामात हयगय करू नका सूचनादेश

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जल शुद्धीकरण केंद्रास अचानक भेट देऊन पाणी पुरवठा सुरळीत आणि योग्य प्रकारे सुरू असल्याची प्रत्यक्ष खातरजमा केली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर हे स्थानी नागरिकांसह भाविक, वारकरी यांना सेवा सुविधा देण्यासाठी सातत्याने विविध उपाय योजना राबवित असतात. या उपक्रमाचा भाग म्हंणून त्यांनी अचानक आळंदी शहरात रात्रीचा दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी आळंदी नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्रात भेट देत पाणी पुरवठ्याचे अनुषंगाने जलशुद्धीकरण प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती जानुन घेतली. यावेळी त्यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना पाण्याची गुणवत्ता, नियमितता व वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासह पाण्याचे नमुने घेऊन तपासण्याचे सूचना केल्या. भाविक, वारकरी आणि नागरिकां पर्यंत स्वच्छ व अखंड पाणी पुरवठ्यास त्यांनी प्राधान्य दिले असल्याआचे सांगितले.
आळंदीत रात्रीस खेळ चाले मुख्याधिकारी रात्री अचानक स्वच्छतेच्या पाहणी मोहीमेवर
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नुकतीच रात्रीच्या स्वचातेच्या कामाची अचानक पाहणी करून शहरात रात्री सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कामात काय चालतेय या कामाची पाहणी केली. आळंदीत दिवस, रात्र शहर स्वच्छतेच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून रात्री होत असलेल्या शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा त्यांनी अचानक पाहणी करीत घेतला. या पाहणी दरम्यान त्यांनी प्रदक्षिणा मार्गावर व व्यावसायिक ( कमर्शियल ) भागात रात्रीची साफसफाई नियमित व सक्रीय पणे होते का, या बाबत रात्री अचानक पाहणी दौरा करीत खातरजमा केली. या भागांत रात्रीचे कचरा संकलन ( Garbage Collection ) योग्य वेळी आणि नियमितपणे होत असल्याची ही प्रत्यक्ष पाहणी केली. मुख्याधिकारी श्री. खांडेकर यांनी संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या कामात कोणतीही कसूर राहू नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी देत संबंधित कर्मचारी, विभागप्रमुख यांना तंबी दिली. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येणाऱ्या भाविकांसह नागरिकांना सकाळी देवदर्शनास ये जा करताना प्रसन्न वातावरण मिळावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच ही मोहिम सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीतील व्यापा-यांना कचरा घंटागाडीतच देण्याचे आवाहन
आळंदी नगरपरिषदेने सर्व स्थानिक व्यापारी, विक्रेते, भाजी वाले, फळ विक्रेते, पथारी व्यावसायिक यांना जाहीर आवाहन केले असून सर्व प्रकारच्या व्यापारी विक्रेते यांनी आपापला कचरा डस्ट बिन मध्ये ओला, सुका कचरा जागेवरच वर्गीकरण करून आळंदी नगरपरिषदेच्या घंटागाडीतच सुपूर्द करावा. सर्व व्यापारी / वाणिज्य / दुकाने असणाऱ्या परिसरात नगरपरिषदेच्या वतीने घंटा गाडी रोज रात्री ८ : ३० ते १० : ३० या वेळेत शहरातील व्यापारी आस्थापना यांचे कडून कचरा संकलनास फिरणार आहे. व्यापारी, नागरिक यांनी आपला कचरा रस्त्यावर, दुकाना समोर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकू नये, आपल्या दुकाना तील सर्व कचरा फक्त घंटा गाडीतच देण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी, हरित आळंदीचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भागात घंटागाडी न आल्यास सुपरवाइजर रोहन जगदाळे संपर्क क्रमांक ८००७८४५४००, सिटी कॉर्डिनेटर शशांक कदम ९२८४४५४५३० यांचेशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














