ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त अग्निशमन विभागाचे विविध उपक्रमांचे आयोजन

Spread the love

चिखली ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय अग्निशमन दिनाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये अग्निसुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने १४ ते २० एप्रिल दरम्यान राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळा, दवाखाना, सार्वजनिक ठिकाणी एखादी घटना घडल्यास त्यास कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करणे, असे विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमाअंतर्गत रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस, वॉर्ड बॉईज, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी यांना अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना, अग्निशामक यंत्रसामग्रीचा योग्य वापर, तसेच आग आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे इमारतीबाहेर पडण्याच्या पद्धतींचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

कार्यक्रमात उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य, लीडिंग फायरमन शाहू व्हनमाने तसेच त्यांच्या पथकातील फायरमन सहभागी झाले होते. यावेळी शीघ्र प्रतिसाद वाहन (१) व वॉटर टेंडर (१) या अग्निशमन वाहनांचा वापर करून विविध आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक विभागाचे स्वागत केले. व संपूर्ण मॉक ड्रिल सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिळाला. या उपक्रमामुळे रुग्णालयातील सर्व घटकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत सजगता व सुरक्षा उपायांची जाणीव निर्माण झाली.

पिंपरी चिंचवड शहरात खाजगी तसेच अनेक खाजगी रुग्णालये आहेत. रुग्णालये ही संवेदनशील ठिकाणे असतात. अशा ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना ओळखता याव्यात,त्यावर तत्पर प्रतिसाद देता यावा व रुग्ण व इतरांची सुरक्षा करता यावी यासाठी हा उपक्रम रुग्णालयात घेण्यात आला. रुग्ण व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता नक्कीच वाढेल.
मनोज लोणकर , उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button