ताज्या घडामोडीपिंपरी

बदलापूर घटनेच्या  निषेधार्थ  महाविकास आघाडीच्यावतीने आंबेडकर चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध 

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज  पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

त्या अत्याचारी नराधमास फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये गृहखातं पूर्णपणे झोपलेले असल्याचे दिसून येते. या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार अत्यंत असंवेदनशील असून राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. भारतीय संविधान व न्यायव्यवस्था यांचा आदर करणारे आम्ही लोक आहोत, त्यामुळे राज्यव्यापी बंद न करता निषेध आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु या सर्व अत्याचारांच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने पायउतार व्हावे.
या आंदोलन  शहरप्रमुख  ऍडव्होकेट सचिन भोसले यांच्यासह  महाविकास आघाडी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button