Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आळंदीत क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद
ताज्या घडामोडी

आळंदीत क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com20 August 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

१५ ऑगस्ट दिनी माऊली मंदिरात लक्षवेधी उपक्रम उत्साहात
आळंदीकरांनी लुटला देशभक्तीचा आनंद

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिला क्रांतिकारक जर कोण असेल तर ते आद्य क्रांतिकारक भगवान विष्णू होत.त्यांनी वराह अवतारात पृथ्वीस दुष्टांपासून सोडविले. जमिनीला मातृत्वाचा अधिकार दिला. स्वातंत्र्य दिनी आळंदी मंदिरात २००० क्रांतिकारकांचे छायाचित्रांचे प्रदर्शन होत आहे. याचा आनंद होत आहे. यापुढे असेच अधिक प्रशस्त जागेत अतिशय उत्तम प्रदर्शन पुन्हा भरवावे. त्यास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी देवस्थान करेल अशी ग्वाही सर्व क्रांतीकारकांच्या त्यागाच्या देश सेवेच्या भूमिकेस वंदन करीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांनी दिली.

देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे अंतर्गत ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत २ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे मोफत प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी जनहित फाउंडेशन, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन यांचे वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदशन करताना योगीजीं बोलत होते.

या प्रसंगी देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, ग्यानज्योत इंग्लिश स्कुल संचालिका कीर्ती घुंडरे पाटील, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया मराठवाडा विभाग अध्यक्ष रवींद्र जाधव, सोशल मीडिया प्रमुख वैभव दहिफळे, बाबासाहेब भंडारे, राजेश नागरे, आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, शाखा प्रमुख रोहिदास कदम, अमर गायकवाड, सोमनाथ बेंडाले, रामदास दाभाडे,पोलिस मित्र युवा महासंघ अध्यक्ष प्रवीण बोबडे, ज्योती पाटील, रामचंद्रकाका कुऱ्हाडे, दिनकर तांबे, गोविंद तौर आदी  उपस्थित होते.

मोफत प्रदर्शनास हजारो भाविक, वारकरी, नागरिक आणि दर्शनार्थी यांनी भेट देऊन क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद देत आपले अभिप्राय उत्स्फुर्द पणे नोंदविले. प्रदर्शनाचे उद्घाटन १५ ऑगस्ट दिनी माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख श्री योगी निरंजन नाथजी यांचे हस्ते झाले. देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने लिखित १०,००० क्रांतिकारकांची माहिती देणारा देशभक्तकोश तसेच २००० क्रांतिकारकांच्या छायाचित्राचे प्रदर्शन व अन्य दुर्मिळ डिजिटल ठेवा या ठिकाणी मोफत पाहण्यास तसेच वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील २००० क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मोफत प्रदर्शन देशभक्तीमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात उत्साहात झाले. दिवसभरात सुमारे २० हजारावर भाविकांनी प्रतिसाद दिला.

आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी म्हणाले, कोणताही संकल्प हा जेव्हा सत्य असतो. तेव्हा तिथं सत्यनारायण उपस्थित असतात. सत्यनारायण याचा अर्थ सांगत ते म्हणाले, जेवढे काही थोर क्रांतिकारक आहेत. ते प्रत्येक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवतरलेले एक प्रकारचे स्वतंत्रतेचे संतच होय. देशभक्ती आणि देवभक्ती यामध्ये धर्माचे अधिष्ठान असते. ज्या ज्या क्रांतीकारकांना शिक्षा झाली. ती काळ्या पाण्याची असो, कि जेलची. त्या त्या क्रांतिकारकांनी त्यांच्या एकांत वासाच्या तुरुंगवासात आपला अनुभव हा धर्मात उतरविला. लोकमान्य टिळक यांनी ज्या गीतेतील रचना केल्या त्याही अंदमान येथील एकांतवासात. क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे लिखाण देखील एकांतवासात झाले आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या रचना कार्य देखील तुरुंगवासात झाले आहे. देव आणि धर्म यांचे मध्ये देश आहे. आणि देशाचे आपण काही देणे लागतो. १८५७ च्या स्वतंत्रता संग्राम मध्ये वंदे मातरम हे गाणे सर्व क्रांतिकारकांच्या मुखावर होते. भक्ती हि स्वतंत्र असते. भक्ती हा भागवत धर्माचा पाय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जमिनीला मातृत्वाचा अधिकार दिला. सर्वात आदी या जमिनीला ( मेदिनी ) पृथ्वीस दुष्टांपासून सोडविण्याचे कार्य, जर कोणी केले असेल तर भगवान विष्णू यांनी केले. यामुळे पहिला क्रांतिकारक जर कोण असेल तर ते आद्य क्रांतिकारक भगवान विष्णू होत. या ठिकाणी २००० क्रांतिकारकांचे छायाचित्र प्रदर्शित झाली आहेत. सर्व क्रांतीकारकांच्या त्यागाच्या देश सेवेच्या भूमिकेस त्यांनी वंदन केले. अतिशय उत्तम असे प्रदर्शन यापुढील काळात पुन्हा भरवावे. त्यास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी देवस्थान करेल अशी ग्वाही विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी दिली.
या प्रदर्शनात २ हजार ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची सविस्तर माहिती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ७५ फोटो वेगवेगळ्या माध्यमांतुन उपलब्ध करून प्रदर्शित करण्यात आल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. आळंदी मंदिरात झालेल्या या प्रदर्शनास खूप मोठा प्रतिसाद मिळाल्याचे देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांनी सांगितले. आळंदी परिसरातील शालेय मुलांनी पालकांसह तसेच नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन छायाचित्र प्रदर्शनास प्रतिसाद दिला. ९४८
दिवसाच्या ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर या परीक्रमेची तसेच २००० छायाचित्रांचे प्रदर्शन या संकल्पनेची लोक जागरणासाठी गरज असल्याचे विधीतज्ञ् नंदिनी शहासने यांनी प्रास्ताविकात सांगत उपक्रमाची माहिती देत संवाद साधला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्ञानेश्वर महाराज मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी अर्पण
Next Article राजमाता जिजाऊ शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.