ताज्या घडामोडीपिंपरी

काळेवाडीत आशा स्वयंसेविकांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा

Spread the love

 

युवक काँग्रेसच्या वतीने आशा स्वयंसेविकांचा आरोग्य दूत पुरस्काराने सन्मान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी येथे देशाच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभागातील आशा स्वयंसेविकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने १९ आशा स्वयंसेविकांना ‘आरोग्य दूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कैलास कदम, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस बिंदूताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते गौरव चौधरी, कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष सजी वर्की, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, सेवा दल मा.अध्यक्ष मकरध्वज यादव, हिरामण खवळे पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, जिल्हा सरचिटणीस जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, जिल्हा प्रवक्ते विशाल कसबे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जमीर शेख, शक्ती सुपर शी समन्वयक विनिता तिवारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून शोभा दत्तात्रेय मस्के, सुवर्णा अरुण पवार, संगीता संदीप मोरे, क्रांती दिनकर होनमुने, मृणाली कमलेश वाघमारे, नुसरत मोसिन शेख, शैला निलेश दाभेकर, जयश्री मारुती चासकर, प्रियंका विलास चासकर नीलम हिरालाल जाधव, सरिता सहदेव गोळे, प्रज्ञा मंगेश ओवाळ, ज्योती विनोद पाचारणे, योगिता पप्पू पालवे, अंजली विनोद जावळे, नीता आनंद कारंडे, शोभा नरसिंग पांचाळ, मनीषा भरत दौंड, राणी गोविंद थोरात या आशा स्वयंसेविकांचा सन्मानपत्र आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने युवक काँग्रेसच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेतील व ‘डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर’ संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button