Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पनवेल-नवी मुंबई विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा – खासदार बारणे
ताज्या घडामोडी

पनवेल-नवी मुंबई विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा – खासदार बारणे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 August 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवसेंदिवस विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत असल्यामुळे विमानतळांवर आता रेल्वे स्टेशन सारखी गर्दी होऊ लागली आहे. पुणे व मुंबई विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पनवेल-नवी मुंबई येथे होत असलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

केंद्र शासनाच्या वतीने मांडण्यात आलेल्या भारतीय विमान विधेयक 2024 वर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत खासदार बारणे यांनी वरील मागणी केली.

खासदार बारणे म्हणाले की, सद्यस्थितीत भारतात 157 विमानतळ आहेत. देशातील वाढत्या लोकसंख्येनुसार विमानतळे वाढण्याची आवश्यकता आहे. एका अहवालानुसार 16 कोटी लोक विमानाने प्रवास करत आहेत. 3 कोटी लोक पहिल्यांदा प्रवास करत आहे. 2030 पर्यंत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 30 कोटींपर्यंत जाऊ शकते.

जानेवारी ते जून 2024 दरम्यान 7 कोटी 93 लाख लोकांनी देशाअंतर्गत विमान प्रवास केला. गेल्यावर्षी 7 कोटी 60 लाख लोकांनी प्रवास केला होता. काही खासगी कंपन्या विमानाचे उड्डाण रद्द केल्यानंतर त्याचे पैसे परत करत नाहीत. मनमानी केली जाते. हे टाळण्यासाठी नवीन विमानतळ झाली पाहिजेत, असे बारणे म्हणाले. प्रवशांना सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत. विमानतळावरील कर्मचा-यांना सौम्य बोलणे, यात्री सेवेसंबंधी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पुणे विमानतळ हे संरक्षण विभागाचा सर्वाधिक वावर असलेले विमानतळ आहे. अनेक विमानांचे उड्डाण तेथून होते. त्यामुळे अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे पुण्यात नवीन विमानतळ निर्माण करण्याबाबत पाऊले उचलावीत. देशात केंद्र आणि राज्य सरकार विमानतळाची निर्मिती करतात. मुंबईतही विमानतळावर मोठे गर्दी होत आहे. त्यासाठी एअरलाईन्सकडून प्रवाशांना दोन – तीन तास अगोदर विमानतळावर बोलविले जाते. या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील पनवेलमधील विमानतळ लवकरात-लवकर सुरु करावे, अशी मागणी बारणे यांनी केली.

‘नव्या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे’

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमध्ये नवी मुंबई विमानतळ बनत आहे. या विमानतळावरुन 2025 मध्ये विमानांचे उड्डाण होईल. विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण करताना लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले होते. आंदोलनादरम्यान तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. स्थानिक नागरिकांची विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबतचा ठराव राज्य सरकारने पाठविला आहे. त्यालाही केंद्र शासनाने मान्यता द्यावी, या मागणीचा बारणे यांनी पुनरुच्चार केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतळवडे येथील नागरिकांना विजेच्या समस्येपासून केले वंचित, शांताराम भालेकर यांनी सोडवला प्रश्न
Next Article घरोघरी तिरंगा मोहिमेस महापालिकेच्या वतीने प्रारंभ
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.