प्रतिभा महाविद्यालयाने केला सायबर जनजागृती दिवस साजरा
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजचे प्राचार्य अरुण कुमार वाळुंज, सीईओ राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या क्षितिजा गांधी, आय क्यू एसी कॉर्डिनेटर जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वच्छानी एचओडी ऑफ सी.एस., हेड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट तसेच सुप्रिया गायकवाड व उज्वला फलक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर जनजागृती दिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रतिभा महाविद्यालय व क्विक हिल फाउंडेशन यांच्यामध्ये सायबर जनजागृती करार करण्यात आला.
या प्रकल्पामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी समाविष्ट आहेत. 7 ऑगस्ट रोजी सायबर जनजागृती दिवस महाविद्यालयाद्वारे साजरा करण्यात आला. यामध्ये सायबर क्लब प्रेसिडेंट दिपू सिंग, मीडिया डायरेक्टर बतुल पारावाला, सेक्रेटरी ऑलिव्ह वर्गीस, कम्युनिटी डायरेक्टर संकेत पवार यांनी प्रमुख नेतृत्व केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कडलग, पोहवा चौगुले, गोलंदाज सायबर स्कॉड, पिंपरी पोलीस स्टेशन, आर.पी.एफ. इंस्पेक्टर ए.के.यादव यांनी केले. तसेच सायबर वॉरियर्स राजश्री, पोर्णिमा, श्रुती, संजोगिता, सानिका, अथर्व, रूपाली, प्रीती, ओम, श्रावणी, सुरज, सौरव, अभिलाषा, संकेत, आकाश, पुजा, कीर्ती, दिपू, बतुल, श्रेया, राहुल, संध्या, अमन, मानसी, जोशुवा, मृणाल, नागेश, हरीनी, रोणित यांनी सायबर गुन्ह्याबद्दल आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली.
सायबर जनजागृती दिवस हा सर्व सायबर वॉरियर्सनी उत्साहात साजरा केला. सायबर वॉरियर्सनी रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, बस स्थानके तसेच मॉल, पेट्रोल पंप, व्यवसायिक स्थळे, क्लासेस यामध्ये जाऊन सायबर फ्रॉड विषयक माहितीचा प्रसार केला व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा दिला व सर्व नागरिकांनी उत्तम प्रकारचा प्रतिसाद सुद्धा दिला. अशाप्रकारे सायबर जनजागृती दिवस हा प्रतिभा महाविद्यालयाद्वारा साजरा करण्यात आला.