श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय मध्ये लोकमान्य टिळकांना अभिवादन

चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
विकास शिक्षण मंडळ संचलित शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते इ 5 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यांनी यात उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.
विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक श्री विजय जाधव सर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश दादा जाधव सचिव श्री संजयभाऊ जाधव, संचालक, श्री अमित बच्छाव यांनी देखील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, प्राथ मुख्याध्यापक साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक सुषमा संधान, कोअर कमिटी सदस्य मनीषा जाधव श्रीम छाया ओव्हाळ , बाल विभाग प्रमुख अनिता भोर , अमोल पाटील सपना सावेडकर कॉलेज विभाग प्रमुख अविनाश सावंत ,श्रीमती सुचित्रा झेंडे आदी शिक्षक उपस्थित होते.









