ताज्या घडामोडीपिंपरी

रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना आभिवादन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे उर्मिला ठोंबरे व  डिंपल काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत सर, तसेच शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी विद्यार्थी- पालक उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांनी ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रमुख पाहुणे उर्मिला ठोंबरे अशा म्हणाल्या, देशाच्या आणि मानवाच्या सर्वांगिन प्रगती साठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. ज्योतिबाच्या अनेक पैलूंवर , शर्वरी काटे, या विद्यार्थिनी विद्यार्थिनींने आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर पथनाट्य सादर केले तसेच उर्मिला ठोंबरे, गीतांजली दुबे, स्वाती वक्टे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल मराठी इंग्रजी हिंदीतून माहिती सांगितली. सारिका देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व डिंपल काळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button