ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ

आज मतमोजणी ; उमेदवारांसहित मतदारांची उत्कंठा शिगेला!  मावळात खासदार  कोण श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे 

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) लागणार आहे. चारही मतदारसंघांत चुरशीची लढत असून, आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मावळचा शिलेदार कोण असणार हे आज दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसहित मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.  मावळमध्ये महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. १३ मे रोजी मतदान झाल्यापासून कोण जिंकणार? यावरून कार्यकर्त्यांचा खलबते सुरू आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे आपल्याच नेत्याचा विजय होणार, असा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे.घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार, विद्यमान खासदारांना अवघड जाणार की, ठाकरेंच्या उमेदवाराला लाभ होणार हे पुढील काही तासांतच स्पष्ट होईल
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज  पार पडणार आहे. मावळमधील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतमोजणीसाठी एकूण १०८ टेबलवर १४४ फे-यातून मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्वाधिक २५ फेऱ्या मावळ, पिंपरीच्या तर सगळ्या कमी २३ फे-या चिंचवड व पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी होणार आहेत. साधारणपणे दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ मतदारसंघात एकूण ५४.८७ टक्के मतदान झाले. यामध्ये उरणमध्ये सर्वाधिक तर पनवेल विधानसभेत सर्वात कमी मतदान झाले. या मतदारसंघात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरुष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यापैकी १४ लाख १८ हजार ४३९ जणांनी मतदान केले. त्यामध्ये ७ लाख ७७ हजार ७४२ पुरुष तर ६ लाख ४० हजार ६५१ महिला आणि इतर ४६ जणांनी मतदान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button