ताज्या घडामोडीपिंपरी

अमरधाम स्मशानभूमी निगडी येथील विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी – सचिन काळभोर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -अमरधाम स्मशानभूमी निगडी येथील विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम न करता थेट पद्धतीने विद्युत दाहिनी सुरू करा?, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या कडून नवीन विद्युत दाहिनी काम संपुर्ण झाले असून फक्त राजकीय नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना घेण्यासाठी निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथील विद्युत दाहिनी सुरू करण्यात आलेली नाही.

निगडी भागातील मयत व्यक्ती ह्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी नवीन विद्युत दाहिनी काम गेल्या दोन वर्षापुर्वी सुरू केले होते.

सध्या नवीन विद्युत दाहिनी काम संपुर्ण झाले असून राजकीय नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना निगडी अमरधाम स्मशानभूमी येथील विद्युत दाहिनी उद्घाटन कार्यक्रम घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून खटाटोप सुरू असून त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून जुन्या विद्युत दाहिनी कॉईल नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे जुनी विद्युत दाहिनी खूप गरम होत असून त्या मुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी खुप वेळ वाट पहावी लागत असून त्या ठिकाणी नवीन विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी वाट बघावी लागणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी .

तसेच निगडी गावठाण यमुना नगर त्रिवेणी नगर तळवडे चिखली कुदळवाडी मोशी आकुर्डी प्राधिकरण ह्या ठिकाणी नागरिकांना सोईस्कर अंतरावर निगडी भागातील अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळपास असलेल्या ठिकाणी योग्य ठिकाण असल्यामुळे निगडी अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी येत असून नवीन विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी , असे ही निवेदनात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button