Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»संविधानाच्या रक्षणासाठी बीएसपीला केंद्रात सत्ता द्या – हुलगेश चलवादी
ताज्या घडामोडी

संविधानाच्या रक्षणासाठी बीएसपीला केंद्रात सत्ता द्या – हुलगेश चलवादी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com9 May 2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

मविआ किंवा महायुतीपेक्षा बीएसपी हाच सक्षम पर्याय – राजाराम पाटील

मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून बीएसपीचे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहे. मायावतीजी यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राजाराम पाटील गेम चेंजर ठरतील असा विश्वास बीएसपीचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेश चलवादी यांनी केले.
बुधवारी (दि. ८ मे २०२४) पिंपरी येथे बहुजन समाज पार्टीच्या (बीएसपी) वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हुलगेश चलवादी बोलत होते. यावेळी मावळ लोकसभेचे बीएसपीचे अधिकृत उमेदवार राजाराम पाटील, बीएसपीचे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, मावळ लोकसभा प्रभारी सागर जगताप, मावळ लोकसभा अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी आदी उपस्थित होते.

चलवादी म्हणाले की, बीएसपीचा लढा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानाची रक्षा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तेव्हा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाज पार्टीला सत्तेत आणणे गरजेचे आहे. देशभरात शिक्षण हक्क कायदा राबवण्यासाठी भाजपा सह काँग्रेसही अपयशी ठरलेले आहे. केजी टू पीएचडी शिक्षण मोफत दिले पाहिजे. ओबीसी, मागासवर्गीय अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. मागील दहा वर्षात बेरोजगारी मध्ये राष्ट्रीय पातळीवर ४० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे बेरोजगारीला समूळ संपवण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायांना पूरक धोरणे आणली पाहिजेत. ग्रामीण भागात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार युवक शहराकडे येणार नाही. तर त्याच्या स्थानिक ठिकाणीच त्याला रोजगार दिला पाहिजे, रोजगार निर्मितीसाठी बीएसपी काम करेल. लोकसंख्येनुसार शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये वाढ होणे अपेक्षित असताना हे सरकार शासकीय नोकऱ्यांचा अनुशेष भरून काढत नाही. उलट आरक्षित जागा आवर्जून प्रलंबित ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या सरकार विषयी व सरकारच्या आरक्षणाच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये तीव्र रोष आहे. शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांचा अनुशेष भरून काढून लोकसंख्येच्या निर्देशांकानुसार जागा निर्माण करण्याचे धोरण बीएसपीचे आहे. जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील राज्यांसह भाजपाच्या काळात विविध धर्मांमध्ये तेढ वाढली आहे. राष्ट्राची एकसंधता आणि प्रगती त्यामुळे धोक्यात आली आहे. म्हणूनच सर्व धर्मांमध्ये सलोखा आणि एकोपा निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टीला सत्ता द्या. इडी, आयटी, सीबीआय या केंद्रीय प्रशासकीय संस्थांना हाताशी धरून, आपल्या विरोधी पक्षांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचे काम भाजप करीत आहे. ‘नोटबंदी’ मुळे अर्थव्यवस्थेवर अतिशय वाईट परिणाम झाला. लघुउद्योजक उध्वस्त झाले. भाजपच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या प्रचंड वाढल्या आहेत. या निर्दयी सरकारला पायउतार केले पाहिजे. भाजपने माध्यमांना वेठीला धरले आहे आणि स्वतःला अनुकूल अश्या बातम्या पसरविण्याचा उद्योग ते करत आहेत असेही चलवादी म्हणाले.

बीएसपी चे मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक आणि विशेषतः दलितांवरील अत्याचार भाजप शासनकाळात लक्षणीयरित्या वाढले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा व हत्ती हे चिन्ह घेऊन बसपा लोकसभेच्या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरला आहे. संसदेत कोणतीही चर्चा न करता अध्यादेशांद्वारे राज्य करण्यास प्राधान्य देणाऱ्या या केंद्र सरकारने संसदेचा अवमान केला आहे. तेव्हा संसदेचा सन्मान वाढवण्यासाठी बहन मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला बहुमताने विजय करण्याचा निर्धार मावळ सह देशभरातील सुज्ञ मतदारांनी केला आहे.
एसआरए प्रकल्पासाठी स्वयम विकासाचा पर्याय निवडण्याची मुभा झोपडपट्टीधारकांना दिली पाहिजे. मावळ लोकसभेतील कोळी, आगरी, भंडारी, भटके विमुक्त जाती, ओबीसी, एससी, एसटी समाजावर दोन्ही शिवसेनेने, भाजपने, काँग्रेसने आजपर्यंत अन्याय केला आहे. पेशवाई सारखे आताचे आमदार, खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. कुलाबातील कोळीवाडा मंत्रालयाच्या जवळ आहे, अद्याप येथील या बांधवांना प्रॉपर्टी कार्ड दिले नाही. उरण, नवी मुंबई येथील ५० हजार एकर जमीन शेतकऱ्यांना फसवून घेतली आहे. जेएनपीटी, विमानतळ विकण्याचा घाट म्हणजे हे सरकार देश विकायला निघाले आहे. आता “चाय बेचने वाला अब देश बेच रहा है”. कोळी बांधवांना सेनेने फसवले आहे. आता बीजेपी फसवत आहे. देशाला आरोग्य मंदिराची गरज आहे, पण देशाची विचारधारा मंदिरांकडे जात आहे. त्यांच्या व्यवस्थापनांनी कोरोना काळात मदत दिली का ? याचा विचार केला पाहिजे. जेएनपीटी ला कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्याची मागणी होती. काँग्रेसने जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले. मावळातून उभे असणारे श्रीरंग बारणे बारणे यांना कोळी, आगरी समाजाचे प्रश्नांची जाणीव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही? मागील दहा वर्षात श्रीरंग बारणे उ, पनवेल मध्ये किती वेळ आले? कुळ कायद्याची अंमलबजावणी अध्याप पर्यंत का झाली नाही? ईडब्ल्यूएस योजनेचे निकष बदलण्याची मागणी असताना मागणी का पूर्ण होत नाही? ओएनजीसी प्रकल्पातील कोळी बांधवांचे पुनर्वसन अद्याप का झाले नाही ? याची उत्तरे दहा वर्षापासून खासदार असणाऱ्या बारणे यांनी दिली पाहिजेत राजाराम पाटील म्हणाले.

बीएसपी चे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात सुरू झालेल्या भ्रष्टाचारामुळे देश पोखरून निघाला. काँग्रेस देशाच्या प्रगतीला बाधा आणतो आहे. कॉंग्रेसने ‘गरीबी हटाओ’ चा नारा दिला आणि गरिबांनाच हटवलं. महागाईने गरीब त्रस्त होऊन पार पिचून गेला. त्यामुळे गरिबांचे रोजचे जीवन सुसह्य करण्यासाठी मतदार बीएसपी च्या मागे उभे राहणार आहे.
पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड यांनी आवाहन केले की, कॉंग्रेसच्या काळात कोळसा, साखर, तांदूळ यांचे घोटाळे समोर आले. त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्स, 2 G, इत्यादी घोटाळ्यांनी थैमान घातलं. तेव्हा आर्थिक घोटाळ्यांनी मुक्त भारतासाठी हत्ती चिन्हा समोरील बटन दाबून बीएसपी ला विजयी करा.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोसरीत उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
Next Article Shirur Lok Sabha Election: बेघर, गोरगरिबांना मिळाले हक्काचे घर; म्हणून देऊया महायुतीला साथ!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.