ताज्या घडामोडीपिंपरी
कोल्हे तुम्ही “रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे” यांना सुद्धा विसरले अमोल कोल्हे तुम्ही हे हि करू शकले नाहीत…..विशेष आहे.
तुम्ही पाच वर्षात नक्की केलं काय……? ……..सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष संघटक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १ मे म्हणजे जागतिक कामगार दिन, अन्याया विरुद्ध लढा कसा उभारायचा, जण माणसात अन्याया विरुद्ध चळवळ उभी करून न्याय मिळविता येतो, याची शिकवण देणारे पहिले कामगार नेते रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे, गिरणी कामगारांचा छळ, मिल मालकाकडून होणारी पिळवणूक, सातही दिवस महिनोन्महिने काम करावे लागत असल्याने, गिरणी कामगार आजारी पडणे, अपघात होणे त्यातच कामगारांचा मृत्यू होणे, असे गिरणी कामगारांचे होणारे हाल नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिले, याला आळा बसला पाहिजे, या हेतूने नारायण मेघाजी लोखंडे यांनी, मिल मालकानं विरोधात कामगारांना एकत्र करून पहिली चळवळ उभी केली. म्ह्णून त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात, त्या लढ्यात मिल मालकानं बरोबर झालेल्या वाटाघाटीत गिरणी कामगारांना सात दिवसातून एक सुट्टी असावी, हा निर्णय घेण्यात आला, आज आपण अनुभवतो ती रविवारची सुट्टी म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांची देणंच म्हणावी लागेल. उमेदीच्या काळात त्यांनी केलेलं कार्य पाहून इंग्रजानी त्यांना “रावसाहेब” हि पदवी देखील बहाल केली.
अशा थोर व्यक्तीमत्वाचा इतिहास पुढील पिढीला माहित व्हावा, खेड राजगुरूनगर किंवा चाकण औदयोगिक नगरी मध्ये त्यांचा पूर्णा कृती शिल्प असावे, शासना कडे पाठपुरावा करून त्यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय पद्धतीने साजरी व्हावी, त्यांच्या नावे कामगारांसाठी विविध योजना असाव्यात, अशा अपेक्षेने कोरोना नंतरच्या काळात नुकतीच सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिली होती, खासदार अमोल कोल्हे एका सार्वजनिक कार्यक्रमा करिता पिंपरी चिंचवडला आले होते, त्यावेळी सर्व पत्रकार देखील तेथे हजर होते, माझ्या शिवनेर एक्सप्रेस या साप्ताहिकात नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर आधारित लेख प्रकशित केला होता, तर डॉ. बाबा आढाव यांचे प्रकाशन असलेले, लेखक मनोहर कदम यांनी लिहिलेले नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जीवनावर आधारित ” भारतीय कामगार चळवळीचे जनक” हे पुस्तक व शिवनेर एक्सप्रेस चा अंक खासदार अमोल कोल्हे यांना सार्वजनिक रित्या, त्या कार्यक्रमात भेट म्ह्णून दिला. आणि सांगितले साहेब हे पुस्तक आवश्य वाचावे, त्यास त्यांनी होकार देखील दिला, भेट देताना तसा आमचा फोटो हि घेण्यात आला.
उद्देश हाच होता कि, अमोल कोल्हे डॉक्टर आहेत, समाजाचे हुशार व्यक्तिमत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जनमानसात पोहचविला आहे, तसा रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे यांचा देखील इतिहास सामान्य नागरिकांन पर्यंत पोहचेल, जागतिक दर्जाचे थोर व्यक्तिमत्व नवीन पिढीला अनुभवता येईल, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत त्यांचे तैलचित्र लागेल, याच कामगार नगरी मध्ये त्यांच्या नावाने एखादा चौक असेल, परंतु खासदार अमोल कोल्हे यांनी त्या सर्व अपेक्षा धूसर ठरविल्या. दिलेल्या पुस्तकाचे वाचन त्यांनी केले कि नाही, ते दिलेले पुस्तक त्यांनी न वाचता कुठल्या अडगळीत असेल माहित नाही. १ मे जागतिक कामगार दिन परंतु तुम्हाला त्यांची आठवण सुद्धा आली नसेल, हे मात्र खरे अमोल यांच्याकडून त्या थोर व्यक्तिमत्वा साठी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यात माझा भ्रम निरस झाला होता,
शिरूर लोकसभेतील मतदारांनी मोठ्या अपेक्षेने त्यांना निवडून दिले, जनमानसात असण्या पेक्षा त्यांनी रंगभूमीवर धन्यता मानली, त्यामुळे मतदार संघात त्यांना वेळ देता आला नाही, सर्व मतदारांचा भ्रम निरास झाला, त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी पूर्ण पंचवार्षिक मध्ये नक्की काय केले हा प्रश्न उपस्थित होतो.