स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 430 वी उत्साहात साजरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 430 वी जयंती त्यांचे जन्मगाव वेरूळ या जन्मगावी उत्साहात साजरी करण्यात आली. छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
या जयंती उत्सवाचे उद्घाटन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर भोसले घराण्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे सिंदखेड राजा येथील वंशज शिवाजी जाधवराव, डॉ. संजय गायकवाड, सर्वोच्च न्यायालयातील ऍड. राज पाटील, तानाजी हुसेकर, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारक सल्लागार समिती डॉ. त्रिंबक पाटील, शिवाजी जाधवराव, नानासाहेब कदम, संजय गायकवाड, डॉ. संतोष यादव, प्रशांत सदाफळ, विलास पांगरकर, ऋषिकेश बेंद्रे, प्रा. डॉ, त्रिंबक पाटील, शरद भिंगारे, डॉ. रमेश सूर्यवंशी, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र बनसोड, संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, कार्याध्यक्ष विलास पांगरकर, छावा मराठा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तानाजी हुस्सेकर, सचिन गायकवाड, प्रविण जाधव, सदानंद पाटील, प्रा. कमलाकर कणसे, संदीप सरकटे, विजय काकडे, योगेश केवारे, मच्छिंद्र घोरपडे, रवींद्र सोनवणे, सोमीनाथ आदाने, सचिन आवरगंड, विष्णू आवरगंड, इंद्रजीत आवरगंड, नवनाथ नवघरे, शिवाजीराव ठोंबरे उपस्थित होते.
किशोर चव्हाण यांनी स्मारकाच्या ताब्यात सध्या सहा एकर जागा आहे. त्यातील तीन एकरातील आरोग्य केंद्र हे स्मारकाच्या जागेत असून, मालोजीराजे भोसले यांनी 133 एकर जागेत बांधलेला तलाव, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाने 50 एकरमध्ये उद्यानाचे नियोजन केलेले आहे. तसेच 13 एकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची समाधीस्थळे अशा जवळपास 205 एकरमध्ये स्मारकाचा विकास करणार असल्याचे सांगितले.
मुधोजीराजे भोसले यांनी वेरूळ येथील भोसले घराण्याकडे असलेली 200 एकर जमीन लवकरात लवकर ताब्यात घेवून त्या सर्व जमिनीचे सुशोभीकरण करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
प्रा. रवींद्र बनसोड यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक कामगिरीवर मार्गदर्शन केले. जगातील एकमेव गनिमी कावा म्हणून शहाजीराजे भोसले यांचा उल्लेख केला पाहिजे, एवढेच नव्हे तर ते एकमेव बावन्न बिरुदाचे धनी आहेत.
सूत्रसंचालन डॉ. उद्धव काळे यांनी, तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले.









