Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या घडामोडी

नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 March 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राज्यात सांडपाणी व मैला- रसायनमिश्रीत दुषित पाणी अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करुन सिंचनासाठी देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. बायोमायनिंगच्या माध्यमातून कचराच्छादित जमीन मोकळी केली जाणार आहे. नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे. सांडपाणी थेटपणे नदीत सोडता येणार नाही, असे सरकारचे धोरण आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील आरक्षण क्र. १/१६ येथे उभारण्यात आलेल्या नवीन टाऊन हॉलसह तब्बल १ हजार ५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष शंकर जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त आयुक्त शेखर सिंह, माजी नगरसेवक, पदाधिकारी व महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चिखली ग्रामस्थ व संतपीठ प्रशासनाच्या वतीने तुकोबांची पगडी, मृदंग देवून सन्मान करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांच्या हातांना काम देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती वंदना उपक्रम हाती घेतला. याद्वारे अर्थचक्रामध्ये महिलांचे योगदान घेण्याचा प्रयत्न केला. यासह कौशल्य विकास महत्त्वाचे असून, त्यामुळे रोजगार निर्मितीला मदत होणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारसोबत मनोरंजन-प्रबोधनासाठी सिटी सेंटर उपयोगी ठरेल. शहर चांगले करायचे असेल, तर रस्ते, पाणी आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्ही चाकांनी चांगले काम करीत प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे.
तसेच, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या छायेतील शहर असे न राहता. आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी ६ हजारच काय? आणखी हजारो कोटी रुपयांची कामे आमदार महेश लांडगे घेवून आले, तरी आम्ही ती करणार आहोत, असा विश्वासही फडणवीस यांनी दिला.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मैलाशुद्घीकरण प्रकल्प, चिखली टाऊन हॉलचे उद्घाटन, महिला बचत गट सक्षमीकरण ‘सक्षमा’ प्रकल्प, रोजगार व प्रशिक्षणाच्या ‘कौशल्यम’ प्रकल्प, नवी दिशा प्रकल्प, १७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP अंतर्गत प्रकल्प, प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करणे, तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी चऱ्होली येथील निवासी सदनिकांचे लोकार्पण निगडी येथील जय ट्रेडर्स समोर पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात येत आहे, असे सांगितले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, २०१७ पासून २०२२ पर्यंत आणि आता महायुतीच्या काळात सुमारे ५ हजार कोटी रुपयांची कामे या परिसरात झाली आहेत. त्याचे श्रेय सर्वपक्षीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनालाही जाते. सर्व भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या म्हणून विकासकामे झाली. त्यांचे खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच सर्व विकासप्रकल्प मार्गी लागले. मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी वेस्ट टू एजर्नी, बायोमायनिंग, सीएनडी वेस्ट, बायोगॅस निर्मिती असे अनेक प्रकल्प निर्माण झाले. ‘फ्युचर सिटी’ पिंपरी-चिंचवड असा उल्लेख करीत फडणवीस यांनी शहराच्या विकासाला चालना दिली. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प, वीज वितरणासाठी उपकेंद्र आणि विविध ४०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील पहिले संतपीठ, २००८ पासून शास्तीकर पूर्णपणे माफी करण्यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला. शास्तीकर माफी, उपयोगकर्ता शुल्क रद्द करताना किंवा विकासकामे करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही कोणताही जात-धर्म किंवा पक्षीय भेदभाव केला नाही, असे गौरोद्गारही लांडगे यांनी काढले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या स्मारकासाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने जागा मिळाली, असेही लांडगे यांनी सांगीतले. आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘नटसम्राट’ कोण हे जनता जाणते…
संत तुकाराम महाराज यांच्या नावाने सुरू होत असलेले नाट्यगृह सुरू होत आहे. या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही जगद्गुरू तुकाराम महाराज यांना दिलेली वंदना आहे. पण, सध्या राज्यात नाट्यगृहाबाहेरील नाटकांची चर्चा अधिक आहे. ‘‘गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥’’ या जगद् गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे राज्याच्या राजकारणात कोण अंगाला राख लावून घेत आहे, हे लोकांना माहिती आहे. मनातील कथा कथाकथन करीत आहे. संशयकल्लोळ सुरू आहे.

नटसम्राटासारखे वागले म्हणून नटसम्राट होत नाही. त्यामुळे चुकीचे वागल्यास कट्टयार काळजात घुसणार आहे. त्याची वेदनाही सहन करावी लागणार आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डंपर पलटी केलाच आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलच्यावतीने सुरक्षितता सप्ताह आयोजन
Next Article पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा व जागतिक महिला दिन सन्मान सोहळा उत्साहात
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.