ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरीपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा व जागतिक महिला दिन सन्मान सोहळा उत्साहात

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी न्यायालयचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा व जागतिक महिला दिन सन्मान सोहळा शुक्रवार (दि.८ मार्च) प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या वतीने साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ॲड.सचिन थोपटे होते. तर प्रमुख पाहुणे बार कॅान्सिल ऑफ   महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र उमाप व माजी नगरसेविका ॲड.उर्मिला काळभोर होत्या .

कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून झाली. व त्यावेळी सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार बारच्या वतीने करण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन दरवर्षी वकिलांसाठी खेळ स्पर्धा आयोजीत करतात जसे कि क्रिकेट,बॅडमिंटन,बुध्दिबळ व ईतर त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यंदाचा यंग ॲडव्होकेट ईस्पेर्शनल अवार्ड ॲड.नरेश शामनानी यांना देण्यात आला.सर्व महिला वकिलांना कार्यकारणीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौवरवण्यात आले. वकिलांसाठी मनोरंजणाची व सुरूची भोजनाची व्यवस्था बार असोशिएशनच्या वतीने करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे नियोजन विद्यमान अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले,उपाध्यक्ष ॲड.प्रतिक्षा खिलारी,सचिव ॲड.धनंजय कोकणे,सह-सचिव ॲड.उमेश खंदारे,महिला-सचिव ॲड.मोनिका सचवाणी,खजिनदार ॲड.अजित खराडे,ॲाडिटर ॲड.संदिप तापकिर,सदस्य ॲड. आय्याज शेख,ॲड.फारूख शेख,ॲड.दशरथ बावकर,ॲड.मिनल दर्शले,ॲड.स्वाती गायकवाड,ॲड.अस्मिता पिंगळे यांनी केले तर सुत्र संचालन जेष्ठ विधीज्ञ ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button