

आपुलकी हॉस्पिटल, चैतन्य संस्था, संजय कोठारी, मनोज शेटिया , पुरस्काराचे मानकरी
खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान ही संस्था 2015 साली आनंद शिष्य रत्न परमपूज्य प्रशांतऋषीजी महाराज साब यांच्या प्रेरणेने कासारवाडी या ठिकाणी त्यांचा चातुर्मास असताना स्थापन झाली या संस्थेचा मूळ उद्देश धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवणे. संस्थेच्या वतीने आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त लोकांना नेत्र चिकित्सा करुन चष्मे वाटप करण्यात आले.
तसेच ३०० पेक्षा जास्त रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले,आणि विविध क्षेत्रांमध्ये उदा: शिक्षण क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, धार्मिक क्षेत्र आरोग्य क्षेत्र साहित्य क्षेत्र, मानव सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेल्या जैन बंधू-भगिनींचा यथायोग्य पुरस्कार देऊन सन्मान करणे या दृष्टीने गेली ७ वर्षापासून ही संस्था समाजातील अशा कर्तृत्व संपन्न व्यक्तींची निवड करून प पू प्रशांतऋषीजी महाराज यांच्या दीक्षा दिना औचित्य साधून हा पुरस्कार समारोह संपन्न करत असते. यावर्षी राजगुरुनगर खेड येथे परमपूज्य प्रशांतऋषीजी महाराज ,परमपूज्य मधुस्मिताजी म सा, परमपूज्य विजय स्मिता जी म सा यांचा चातुर्मास संपन्न होत आहे .
प पू प्रशांतऋषीजी महाराज यांच्या ४६व्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान राजगुरुनगर संघाच्या वतीने जैन स्थानकाच्या सभागृहामध्ये करण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष संदीप फुलफगर, महामंत्री चंद्रशेखर लुंकड , कोषाध्यक्ष प्रणित बागमार, विश्वस्त विलासकुमार पगारिया , दिलीप भन्साळी, संदीप चोरडिया, वसंतलाल बोरा,तसेच राजगुरुनगर श्री संघाचे अध्यक्ष अजय बलदोटा ,महामंत्री चंदन खारीवाल तसेच इतर पदाधिकारी व माजी अध्यक्ष विजयजी भन्साळी ,संतोषजी बोथरा, प्रदीप जी कासवा प्रकाशजी गदिया, लालचंदजी कर्नावट ,सुशील शिंगवी आणि , सुनन्दा भन्साळी ,योगिता भन्साळी ,अजितजी लुनावत विपुलजी कर्नावट अशा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सुंदर ट्रॉफी ,शाल आणि पंचरंगी पट्टा असे या पुरस्काराचे स्वरूप असून आचार्य सम्राट प पू आनंदऋषीजी महाराज साब च्या नावाने दिलेला हा महर्षी आनंद सेवा पुरस्कार चार मान्यवरांना देण्यात आला. आपुलकी हॉस्पिटल ही कॅन्सर आजाराच्या क्षेत्रात उपचार करणारी मोठी संस्था असून या संस्थेमध्ये कमी दरामध्ये उपचार केले जातात योग्य ती कॅन्सरची ट्रीटमेंट देऊन कॅन्सरचे रोगी बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. या हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ प्रितेश मनोत यांनी आरोग्य सेवेच्या क्षेत्रामधील पुरस्कार स्विकारला .मानवसेवा क्षेत्रामधील पुरस्कार जामखेड येथील संजयजी कोठारी यांना देण्यात आला. संजयजी कोठारी यांनी आतापर्यंत साडेसात हजार पेक्षा जास्त अपघातग्रस्त रुग्णांना वाचवले असून अनाथ मुले, वृद्ध, निराधार महिला आणि विद्यार्थी या सर्वांना गेली 40 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचे काम डॉ संजय कोठारी करीत आहेत. स्वतःच्या ॲम्बुलन्स मधून अपघात रुग्णांना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना उपचार करण्याचे मानवतेचे महान कार्य ते करत आहेत .
तिसरा पुरस्कार प्रशासन सेवेतील पुरस्कार. हा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नव्यानेच पदोन्नती मिळालेले श्री मनोज शेटिया यांना देण्यात आला श्री मनोज शेटिया यांची महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनियर या पदापासून शहर अभियंता या सर्वोच्च पदावर पदोन्नती झाली असून अतिशय उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे चौथा पुरस्कार महिला सक्षमीकरण क्षेत्रातील हा पुरस्कार चैतन्य संस्थेला देण्यात आला . राजगुरुनगर येथे गेले अनेक वर्षापासून ही संस्था महिला सक्षमीकरण या क्षेत्रात काम करीत आहे महिलांचे बचत गट ,महिलांना विविध उद्योगांसाठी प्रोत्साहन, महिलांना आर्थिक मदत अशा विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवित आहे .या संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुधाताई कोठारी व रेखाजी शत्रिय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हे सर्व पुरस्कार आनंद महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया राजगुरुनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अजय बलदोटा यांच्या शुभहस्ते आणि या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी तसेच श्री संघाचे माजी अध्यक्ष यांच्या उपस्थितीत, प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमासाठी पुरस्कारार्थींचे सहकारी कार्यकर्ते तसेच श्री संघाचे पदाधिकारी श्रावक श्राविका, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सुत्रसंचालन चंदन खारीवाल आणि डॉ अशोककुमार पगारिया यांनी केले व अजय बलदोटा यांनी आभार मानले.



















