

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेला विषय अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. सत्ताधारी भाजपने आपल्या वाट्याला आलेल्या सात स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली असून, महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडूनही तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात आता दहा स्वीकृत नगरसेवकांची भर पडणार आहे.
भाजपकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जयनाथ काटे, सचिन साठे आणि विशाल कलाटे यांना संधी देण्यात आली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून ऋषिकेश म्हेत्रे आणि कुलदीप परांडे, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राजेश पिल्ले आणि कुणाल लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना १५ महिन्यांचा म्हणजेच सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार आहे.
यावेळी पक्षनेते प्रशांत शितोळे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर शर्मिला बाबर आदी उपस्थित होते. संबंधितांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रशासनामार्फत नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने मार्च महिन्यात सर्वसाधारण सभेसमोर आणला होता. मात्र, भाजपमध्ये सात नावांवर एकमत होत नसल्याने हा विषय वारंवार रखडला. मार्चमध्ये प्रस्ताव सभेसमोर आल्यानंतर तो काही महिने तहकूब करण्यात आला. जूनमध्ये तो दफ्तरी दाखल करण्यात आला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा प्रस्ताव आणण्यात आला; मात्र सभा तहकूब झाली. पुढे विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबली. परिणामी, स्वीकृत नगरसेवकांचा नऊ महिन्यांचा कार्यकाळ वाया गेला आहे.
संख्याबळानुसार भाजपचे सात, राष्ट्रवादीचे तीन सदस्य
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांपैकी भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, शिवसेनेचे (शिंदे गट) सहा आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या संख्याबळानुसार महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असून, त्यापैकी सात जागा भाजपला तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत.
सीमा सावळे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भोसरीतील इंद्रायणीनगर प्रभागातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सावळे यांना पक्षाने सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. राजेंद्र जगताप यांनाही निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने संधी दिली आहे. तर फजल शेख हे पक्षाचे कार्याध्यक्ष असून, शिक्षण मंडळाचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
नऊ महिन्यांचा कालावधी वाया; नियुक्ती प्रक्रिया रखडली
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने मार्च महिन्यात सर्वसाधारण सभेसमोर आणला होता. मात्र, भाजपमध्ये सात नावांवर एकमत होत नसल्याने हा विषय वारंवार रखडला. मार्चमध्ये प्रस्ताव सभेसमोर आल्यानंतर तो काही महिने तहकूब करण्यात आला. जूनमध्ये तो दफ्तरी दाखल करण्यात आला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा प्रस्ताव आणण्यात आला; मात्र सभा तहकूब झाली. पुढे विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबली. परिणामी, स्वीकृत नगरसेवकांचा नऊ महिन्यांचा कार्यकाळ वाया गेला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांपैकी भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, शिवसेनेचे (शिंदे गट) सहा आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या संख्याबळानुसार महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असून, त्यापैकी सात जागा भाजपला तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत.
स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होऊन विविध विषयांवर मते मांडण्याचा अधिकार असतो. मात्र, मतदानाचा अधिकार नसतो. प्रशासन, कायदा, वैद्यकीय, शिक्षण, अभियांत्रिकी, लेखा आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींना या पदावर संधी देण्याची तरतूद आहे.
आता या दहा नावांच्या अधिकृत नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत कधी मंजूर होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



















