
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिक आणि युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, पिंपरी विधानसभा माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. आरोग्य तपासणीचा ४५ नागरिकांनी लाभ घेतला, तर ३३ जणांनी रक्त तपासणी, २५ जणांनी नेत्र तपासणी आणि ४० जणांनी बॉडी फॅट तपासणी करून घेतली. रोजगार मेळाव्यात नोकरीच्या संधीसाठी ६० युवक-युवतींनी नोंदणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, वैभवी घोडके, दीप्ती काळभोर, उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मणियार, पक्षाचे निवडणूक प्रमुख अशोकराव वाळके, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी शेळके, दिलीप सावंत, कैलास नेवासकर, नागेश नामदे, शैलेश मोरे, युवासेनेचे प्रवीण पाटील, प्रशांत पाटील, सुधीर कुंभार, विशाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन गोविंदराव शिंदे, कृष्णा माने, किशोर शिंदे, ऋषिकेश घोरपडे आणि श्री. तोरणे यांनी केले.



















