
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सहकार क्षेत्रातील अग्रणी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.
“वसंतदादांचे विचार, सहकाराचा वारसा आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” असे मत यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, काँग्रेसचे सरचिटणीस विल्यम साळवी, रामकिसन माने, हरीश डोळस, देवदत्त रानवडे, नितीन सोनवने, रितिका शर्मा व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वसंतदादांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.



















