
आळंदी जनहित फाउंडेशनची गतिरोधक बसवण्याची मागणी
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदीतील भराव रस्त्यावर लोखंडी गेट, आळंदी देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी असताना थेट सर्व प्रकारच्या गाड्या माऊली मंदिरासमोर थेट येतात. यामुळे भाविक आणि मंदिर व परिसर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भराव रस्त्यावर एकही गती रोधक नसल्याने वाहने सुसाट मंदिराकडे येतात. भराव रस्त्यावर नो पार्किंग बोर्ड नावापुरता असून ५० मीटर दोन्ही बाजूने वाहन पार्क करण्यास मनाई असताना बेशिस्त पार्किंग वाढली असल्याने भाविक, नागरिकांना ये जा करण्यास गैरसोयीचे होत आहे. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलं
आळंदी नगरपरिषदेने गावभर गतिरोधक बसविले. मात्र मंदिर परिसरातील वर्दळीचा मुख्य भराव रस्त्यावर गतिरोधक विकसित करण्यास विसर पडला आहे. तत्काळ भराव रस्त्यावर चार ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे.



















