
तळेगाव दाभाडे येथे रविवारी सायंकाळी कोजागिरी सांगीतिक मैफिलीचे आयोजन
तळेगाव दाभाडे, – (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखा आणि सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्तपणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त संपदा थिटे प्रस्तुत स्वर पौर्णिमा या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सेवाधाम वाचनालय प्रांगण तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.
या सांगीतिक मैफिलीत कलाकार मीनल पोंक्षे, शुभदा आठवले आणि संपदा थिटे यांचे गायन होणार आहे. त्यांना कीबोर्डवर ओंकार पाटणकर, तबल्यावर विनीत तिकोनकर, तालवाद्य गंधार ढवळे आणि निवेदन माधुरी कुलकर्णी करणार आहेत. तसेच कीर्ती ढेंबे व कलाकीर्ती नृत्यालयाच्या विद्यार्थिनी नृत्य अविष्कार सादर करणार आहेत. ध्वनि संयोजन केदार अभ्यंकर यांचे असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या कार्यवाह डॉ. वर्षा वाढोकर यांनी दिली.



















