
“सामूहिक वाचनातून वाचन संस्कार..
शाहूनगर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर येथील श्री. शाहू सार्वजनिक वाचनालय वतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे महात्मा फुले जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भगवान गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी म्हणून बालवाचकांकडून विविध बाल साहित्याचे सामूहिक वाचन करून घेण्यात आले. हा एक वेगळा उपक्रम वाचनालयाच्या वतीने राबवण्यात आला आला. जेष्ठ नागरिकांनीही सामूहिक वाचन केले. संस्थेचे सचिव राजाराम वंजारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे उपाध्यक्ष व जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य सांगितले. वाचनाचे महत्त्व सांगत वाचनामुळे आयुष्यामध्ये झालेल्या परिवर्तनाची उदाहरणे सांगितली. वाचन संस्कृती वाढवणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
संचालक भारत गायकवाड, ज्ञानेश्वर बोडके, प्रकाश ननावरे, श्री. कासार व अनेक वाचक या प्रसंगी उपस्थित होते. ग्रंथपाल अनिता पाटील सहग्रंथपाल तेजश्री घेवारी व सहाय्यक रवींद्र अडसूळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सल्लागार गणेश सहाणे यांनी सूत्रसंचालन केले तर खजिनदार राजेंद्र पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



















