
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना अभिवादन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य विनोद नढे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.



















