
‘भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा!’ – पुष्कर औरंगाबादकर
चिन्मय मिशनच्या श्रीमद् भगवद्गीता पठण – वाचन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘श्रीमद् भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा लाभते!’ असे विचार काॅर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी मनोहर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. चिन्मय मिशन, पिंपरी – चिंचवड आयोजित श्रीमद् भगवद्गीता बारावा अध्याय (भक्तियोग) पठण – वाचन उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे औरंगाबादकर बोलत होते. ब्रह्मचारिणी मैत्रेयी चैतन्य, चिन्मय मिशन पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष हेमंत गवंडे, सचिव आनंद देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तर सुमारे पंधराशेहून अधिक संख्येतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि परीक्षक यांची कार्यक्रमस्थळी उपस्थिती होती. यावेळी मैत्रेयी चैतन्य यांनी, ‘भगवद्गीता केवळ पूजनीय ग्रंथ न मानता आचरणप्रणाली झाली पाहिजे!’ असे आवाहन केले.
पिंपरी-चिंचवड परिसरातील सत्तरहून अधिक शाळांमधील सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी आणि दीडशेहून अधिक पालक, शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. अंतिम फेरीत पोहोचलेल्या त्यातील सुमारे एक हजार स्पर्धकांमधून प्रथम क्रमांकप्राप्त विजेते खालीलप्रमाणे :-
अ) गट :
शिवज्ञा पाटील (ज्ञान प्रबोधिनी),
सान्वी खिस्ती (साईनाथ बालक मंदिर), कादंबरी भूमकर (गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल), निमिष मोरे (अमृता विद्यालय), जीविका पानवलकर (सिटी प्राईड स्कूल), सुश्रुत म्हसकर (सिटी प्राईड स्कूल)
ब) गट :
अन्वित रानडे (ज्ञान प्रबोधिनी), आनंदी चौधरी (सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल), नितेश पवार (गायत्री इंटरनॅशनल स्कूल), हर्ष कुलकर्णी (सिटी प्राईड स्कूल), अहिल्या भालेराव (खुला गट), दर्श पगारे (अमृता विद्यालय), आदिराज तरडे (मनोरम प्राथमिक शाळा)
क) गट :
श्रीवेद केसकर (ज्ञान प्रबोधिनी), शिवांश व्हडदी (एस बी पाटील पब्लिक स्कूल), शिवन्या संत (नारायण हट इंग्लिश मीडियम स्कूल), अद्वैत देवकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल), नीहिरा अमृतकर (सिटी प्राईड स्कूल)
ड) गट :
सुमेध पाटील (संत तुकाराममहाराज स्कूल), अवनीश चांगण (प्रियदर्शनी स्कूल), धीरज पाटील (एस पी एम मराठी माध्यम शाळा, द्युती आफळे (ज्ञान प्रबोधिनी)
ई) गट :
वरेण्या पराशरम् (द स्टेपिंग स्टोन स्कूल), रेया सिंग (खुला गट), अनुष्का लोहार (व्ही के माटे हायस्कूल), स्वरा शिंदे (गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल)
फ) गट :
आर्या भिडे (एस पी एम इंग्लिश मीडियम स्कूल)
पालक, शिक्षक गटातून वाचनामध्ये हर्षदा बरोटे, कांचन व्हडदी, अनघा लेले, पूनम रायते आणि पठणामध्ये प्रज्ञा रानडे, प्रज्ञा चिटणीस, वंदना निकम यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. उल्लेखनीय सहभागाबद्दल सिटी प्राईड स्कूल या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला; तर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ज्ञान प्रबोधिनीच्या डाॅ. मनोज देवळेकर आणि शिक्षकवृंदाचा विशेष सन्मान करण्यात आला. दीपाली फडके यांनी सूत्रसंचालन केले.



















