
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि लायन्स क्लब इनोवेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ प्राधिकरण निगडी येथे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री निखिल जी लातूरकर होते.प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी ब्रह्मोद्योग प्रदेश उपाध्यक्ष राजनजी बुडुख महासंघाचे प्रमुख प्रवक्ते डॉ. संजय सुपेकर त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ इनोवेशन चे अध्यक्ष संदेश मुखेडकर,Z C प्रवीण शेलार ,सलीम भाई शिकलगार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन आणि गणपती स्तोत्र म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी केले. त्यांनी महासंघाचे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये चालणारे कार्य आणि कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
त्याचप्रमाणे महासंघाचे संपूर्ण भारतामध्ये असलेले कार्य प्रदेश सरचिटणीस दिलीप जी कुलकर्णी यांनी सर्वांसमोर मांडले .तसेच लायन्स क्लब ऑफ इनोवेशन चे कार्य लाईन्स क्लबचे सलीम भाई शिकलगार यांनी सर्वांना समजून सांगले सांगितले.
दोन्हीही संस्था या समाजासाठी काम करत आहेत .समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना व व्यक्तींना आणि रुग्णांना दोन्ही संस्था नेहमी सर्वतोपरी मदत करत असतात. या कार्यक्रमाच्या वेळी दहा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यात आली. एकूण 75 विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
मागील वर्षी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमधील प्रथम विजेता सौ सुनिता डोईफोडे सौ सुषमा वैद्य सौ अनिता कुलकर्णी यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले.
महासंघ आणि लायन्स क्लब यांच्या वतीने प्रथमच आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी1)सौ वृंदाताई गोसावी 2)श्री मकरंद गुर्जर,3)सौ स्नेहा शेखर पाठक,4)सौ. जानवी जोशी,5)सौ. दिपाली पाटील,6)श्री.जीवन देशमुख,7)सौ दर्शना पोलकम
8)श्री. नितीन साळी,9)सौ. स्नेहल कुलकर्णी. प्राध्यापक मकरंद गुजर ,नितीन साळी आणि स्नेहा पाठक यांनी आपले पुरस्कारार्थी मनोगत व्यक्त केले. शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित यांचे स्वागत केले. प्रदेश अध्यक्ष निखिल जी लातूरकर यांनी शिक्षक वृंदांना आवाहन केले की त्यांनी समाजातील किमान दोन विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण द्यावे किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारावी. विद्यार्थ्यांचे विजेत्या स्पर्धकांचे आणि शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
प्रमुख वक्ते प्राध्यापक भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात कल आहे त्या क्षेत्रात जाऊ द्या.तसेच आधुनिक प्रगत आणि शेती तंत्रज्ञानाचे त्यांनी सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना दिले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सरचिटणीस आनंद देशमुख यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आश्विन गुडसूडकर यांनी केले. सौ सुषमा वैद्य यांनी सामुदायिक पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला आघाडीच्या सुषमा वैद्य,संध्या कुलकर्णी,संगीता कुलकर्णी,स्नेहा पाठक,वैशाली कुलकर्णी,कविता बारसावडे,धनश्री देशमुख त्याचप्रमाणे अभय कुलकर्णी,राहुल कुलकर्णी,संजय परळीकर,भाऊ कुलकर्णी,भूषण जोशी,शामकांत कुलकर्णी मकरंद कुलकर्णी पवन वैद्य,आर्य इनामदार,श्री शिनकर काका,गोपाळ बिरारी,प्रवीण कुरबेट आणि लायन्स क्लब व महासंघातील इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
















