
आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती.
राजस्थान, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आबू रोड ९ सप्टेंबर : श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ या संकल्पनेवर आधारित ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया सम्मेलनचे स्वागत सत्र बुधवारी आबू रोड येथील मानसरोवरच्या दिव्य शक्ती अनुभूती हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.९ ते १३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या सम्मेलनात भारतातील विविध राज्यांसह फ्रान्स,ऑस्ट्रेलिया आणि नेपाळ येथील पत्रकार व मीडिया प्रतिनिधी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र सहभागी झाले असावे.त्यामुळे पत्रकारांच्या या मोठ्या सहभागामुळे सभागृहही अपुरे पडले होते.देशाच्या मीडिया जगतासाठी हा विशेष प्रसंग होता.
या कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्राच्या पत्रकारांनी दिला जय महाराष्ट्रचा नारा
सम्मेलनात विविध राज्यांतून सहभागी झालेल्या पत्रकारांचा परिचय करून देण्यात आला आणि भारतातील आणि भारता बाहेरच्याही या दीड ते दोन हजार पत्रकार बांधवांमधून महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथील महास्त्र पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय मराठे,पिंपरी चिंचवड पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रोहित खर्गे,कार्याध्यक्ष दादाराव आढाव,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण शिर्के,शबनम सय्यद आणि उमेश पाटील यांना या भव्य दिव्य व्यासपीठावर जाऊन बीके शांतनुबाई नॅशनल कॉर्डिनेटर,बीके सरला दीदी मीडिया विंग उपाध्यक्ष,बीके निकुंज भाई नॅशनल कॉर्डिनेटर मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करण्याची आशी संधी पहिल्यादाच पत्रकारांना मिळाली आहे.हा सन्मान स्वीकारल्यानंतर मान्यवरांनी पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.त्यावेळी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते.यावेळी महाराष्ट्राच्या पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत वातावरणात आनंद व उत्साह निर्माण झाल्याची माहिती डॉ.सोमनाथ वडनेरे,महाराष्ट्र राज्य समन्वयक मीडिया प्रभाग यांनी दिली.
‘ओम शांती मीडिया’ चे संपादक डॉ.बी.के.गंगाधर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की आज मीडिया केवळ बातम्या देण्याचे माध्यम राहिलेले नाही तर समाजाची विचारसरणी दृष्टिकोन आणि दिशा प्रभावित करणारी प्रभावी व्यवस्था बनली आहे.
मीडिया विंगच्या उपाध्यक्षा बी.के.सरला दीदी यांनी सम्मेलनाचा उद्देश आणि विषय स्पष्ट केला. “परमात्म्याला सुवर्णमय,श्रेष्ठ विश्वाची निर्मिती करण्यासाठी पत्रकारांची मदत हवी आहे,” असे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय मीडिया सम्मेलनासाठी उमेश सणस,तौफिक सय्यद,माऊली भोसले,सारीका भिंगे,गझाला सय्यद,शबनम सय्यद,रफीक सय्यद,सुरेखा काजरोळकर,शबाना शेख,कलिंदर शेख,पुजा पंडित,किसन भोसले,सुनिता कुमारी,शिवाजी घोडे,संतोष महामुनी,पुनम पाटील,लीना माने,अभिजीत पाटील,श्रीधर जगताप,संगीता पाचंगे,सिताराम मोरे,संतोष सागवेकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
















