
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे विरोधी पक्षनेते मा.राहुल गांधी यांच्या माध्यमातून होत असलेल्या विद्यार्थी संवादाच्या छात्रो की गुंज ह्या कार्यक्रमाचा चाप्टर फोर महिला विशेष पुणे येथे काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या विद्यार्थी समाजाच्या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसकडून सुमारे 500 युवतींचा सहभाग करण्यात आला आणि शेकडो अन्य युवक देखील कार्यक्रमात स्थळी राहुल गांधींना ऐकण्यासाठी दाखल झाले होते.
“संपर्क आणि सहभाग या द्विसूत्रीतून कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात शहर काँग्रेसचा विविध महाविद्यालये, महिला संघटना, विद्यार्थी संघटना, युवती संघटना, यांच्याशी संवाद, संपर्क स्टिकर्स च्या माध्यमातून, पोस्टरचे माध्यमातून, बॅनर्स च्या माध्यमातून, इनविटेशन स्मॉल कार्ड च्या माध्यमातून, रील च्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होता त्याला युवतींचा मोठा प्रतिसाद लाभत होता थेट संवादावर अधिक भर देत विद्यार्थिनींना असणाऱ्या महिला विशेष कार्यक्रमाबाबत जागरूक करत शिक्षा रोजगार सुरक्षा समानता या मुद्द्यांच्या आधारे माहिती देऊन एकत्र करून समारंभाला नेण्याबाबत बसेस, मेट्रो, लोकल आणि दुचाकी या वाहनातून नियोजन करण्यात आले” असे काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
शहर काँग्रेसकडून या कार्यक्रमासाठी विशेष युवती समन्वयक म्हणून कु. समरीन कुरेशी आणि कु. गौरी नरसिंगे या दोघींची नियुक्ती करण्यात आली होती या दोघींच्या माध्यमातूनच सर्व प्रचार प्रसार निमंत्रणे आणि सर्व सहभाग करून घेण्यात आले.
काल शहरातून विविध ठिकाणाहून दुपारीच बसेस एकत्रित करून पिंपरी चौकात एकवटण्यात आल्या आणि पिंपरी चौकातून सर्व बसेस या पुणे येथील छात्रो की गुंज कार्यक्रमामध्ये सहभागासाठी रवाना झाल्या कार्यक्रमादरम्यान उत्साह पूर्ण वातावरणात सहभाग दर्शवून पुन्हा नवी ऊर्जा घेऊन येवती शहरांमध्ये परतल्या आहेत.

















