
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांना पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते आणि टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे व ज्येष्ठ कवी सीताराम नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठीक साडेचार वाजता प्रगती टूल्स इंडिया प्रा. लिमिटेड, टी ब्लाॅक, प्लाॅट नं. १६९ – ए, डाॅ. डी. वाय. पाटील काॅलेजसमोर, भोसरी येथे हा सन्मानसोहळा संपन्न होईल, अशी माहिती अकादमीचे सचिव पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली आहे.
















