
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला.
या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष संदीप काटे, मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, मान्यवर पाहुणे, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.
अध्यक्ष संदीप काटे, मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, मान्यवर पाहुणे आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला. त्यांच्या उपस्थितीमुळे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. ‘जबाबदार, सक्षम आणि समृद्ध भारत घडविण्याचा संकल्प’ यावेळी करण्यात आला.
















