
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी कुळदवाडी भागातील बेकादेशीर भंगार गोदामात करोडो रुपये किमतीचे भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी भविष्यात मोठी दुर्घटना घडणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी भाजप चे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
कुदळवाडी येथील मोरे पाटील चौकात एच इंटरप्राईजेस या कंपनीत भयंकर मोठ्या प्रमाणावर भीषण आग लागून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही पण यामुळे अल्युमिनियम मेटल पावडर तयार करणारी कंपनी असून त्या ठिकाणी गंभीर घटना टळली.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कंपनी मध्ये आग लागून १४ महिला कामगार मरण पावले होते तसेच निगडी येथील दळवी नगर भंगार गोदामाला आग लागून चार दुकाने भस्मसात झाली होती शाहू नगर येथील हार्डवेअर दुकानाला आग लागून तीन जम मरण पावले होते तसेच वाकड येथील गॅस सिलेंडर मधून गॅस रिलीफ करताना आग लागून घटना घडल्या असून त्या नंतर आकुर्डी येथील भंगार गोदामाला आग लागून चार पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी कुळदवाडी भागातील बेकादेशीर भंगार गोदामात करोडो रुपये किमतीचे भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी भविष्यात मोठी दुर्घटना घडणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी कुदळवाडी मोशी तळवडे चिखली निगडी आकुर्डी भागात मोठं भंगार गोडाऊन असून १२००/१३०० छोटं मोठं भंगार गोडाऊन असून त्या ठिकाणी करोडो रुपये किमतीचे भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून लोखंडी रॉड लोखंडी पाईप लोखंडी अँगल तांबे पितळ ॲल्युमिनियम टायर रबर वायर रद्दी पुठ्ठे लाकडी खेळणी लाकडी वस्तू पेपर रद्दी गॅस सिलेंडर तसेच गाडीचे इंजिन स्प्रेअर पार्ट इत्यादी वस्तू गोळा करून ठेवल्यामुळे उग वास येत असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. असून त्या ठिकाणी अग्निशामक गाड्या आत मध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून ह्या पुर्वी सुद्धा कुदळवाडी मोशी तळवडे चिखली निगडी आकुर्डी भागात आग लागून मोठ्या घटना घडल्या असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पिंपरी चिंचवड शहर पोलिस गप्प का बसले आहेत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून भविष्यात आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करावे.
















