यंदाचा लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ चषक (पिंपळे गुरव-सांगवी) पटकावला एम.एन.सी. क्रिकेट क्लबने

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ चषक 2024’ (पिंपळे गुरव-सांगवी) पिंपळे गुरवमधील एम.एन.सी. क्रिकेट क्लबने पटकावला. 71 हजार रुपये रोख आणि भव्य ट्रॉफी स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर 8 ते 15 फेब्रुवारी दरम्यान डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथमच ऑक्शन पद्धतीने आयपीलच्या धर्तीवर वीस संघ, वीस संघ मालक या पद्धतीने स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अतीटतीच्या लढतीत पिंपळे गुरवमधील एम.एन.सी. क्रिकेट क्लबने महाविजेता होण्याचा बहुमान मिळवला. तर फिनिक्स बॉईजने द्वितीय क्रमांक पटकावला. सामाजिक कार्यकर्ते अजय दूधभाते, निलेश जगताप, मनीष कुलकर्णी, प्रविण वाघमोडे व त्यांच्या आयोजन कमिटीने निष्पक्षपणे स्पर्धेचे आयोजन केले.
एम.एन.सी. क्रिकेट क्लबचे प्रतिनिधीत्व सुजय खुळे, विनोद सैनी, विजय गोळे, अमित खातळे, प्रवीण पाटील, योगेश बोरकर, निखिल काळे, निखिल कामोणे, हार्मिक चौहान, प्रशांत जाधव, मिलिंद काळे, अमोल माने (संघ मालक आणि उपकर्णधार), ओंकार काशिद (संघ मालक) आणि सुदर्शन मांदळे (कर्णधार ), संघ व्यवस्थापक अक्षय लाळे यांनी केले.
एमएनसीएएस इंडिया प्रा. लि.ने या क्रिकेट क्लबसाठी प्रायोजकत्व केले. सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, एमएनसीएएस’चे संस्थापक योगेश चौधरी व एमएनसीएएस’चे संस्थापक गौरव नेहे यांचे सहकार्य लाभले.














