जनतेच्या साथीने साहेबांची राष्ट्रवादी यश संपादन करेल – कामगार नेते काशिनाथ नखाते
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेळावा.
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणीवपूर्वक दुफळी निर्माण केली आणि निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षानी ज्यांनी पक्ष स्थापन केला वाढवला असे पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांना बाजूला करून पक्षाचे चिन्ह काढून घेतले,अशा फोडाफोडीला जनता कंटाळलेली असून महाराष्ट्रातील जनतेच्या साथीने ,साहेबांचा करिष्मा यातुन आगामी निवडणुकात यशस्वी होऊ असा विश्वास राष्ट्रवादी असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी संघटित कामगार विभाग, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
स्वार्थापायी अनेकजण सोडून गेले तरी शरद पवार यांची ऊर्जा कायम आहे, त्यांची ध्येयधोरणे ,शेतकरी ,
कामगार, महिला, युवा, रोजगार यांच्यासाठी केलेले भरघोस काम केले. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी पक्षाचे नेतृत्व व पक्ष संघटनेवरून निर्णय न देता विधिमंडळ गटावरून चुकीच्या पद्धतीचा निकाल दिला हे पुर्ण चुकीचे आहे.
यामुळे महाराष्ट्रातील जनता साहेबांच्यासोबत आहे. चिन्हाची चिंता करू नका चिन्ह गेले म्हणून पक्षाचे अस्तित्व संपत नाही असे पवार साहेबांनी कालच स्पष्ट केले आहे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील महाराष्ट्र राज्यामध्ये पक्ष संघटना बांधण्याचे यशस्वी काम करीत आहेत. सध्या केवळ जाहिरातीचे सरकार चाललेले असून सामान्य जनता त्रस्त आहे. महागाई, बेरोजगारीसह महाराष्ट्र राज्यातील उद्योग,व्यापार इतर राज्यात घेऊन जात आहेत. महाराष्ट्र राज्याला दुय्यम स्थान देनाऱ्याला आहे .जनता ओळखून आहे, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिद्दीने काम करून पक्षाला यश मिळेल. यासाठी कामगार, श्रमिकवर्ग हा पूर्ण ताकतीने साहेबांसोबत राहील असा विश्वासही नखाते यांनी व्यक्त केला. यावेळी राजेंद्र चव्हाण,नाना कसबे,राहुल कदम, सलीम डांगे,अनिता मोरे, माया जाधव, दिनेश कोरे,किरण पाटील आदी उपस्थित होते. प्रस्तावना राजेश माने यांनी तर आभार भास्कर राठोड यांनी मांनले.