ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन द्वारे शिवजयंती नेहरूनगर पिंपरी न्यायालयात साजरी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन द्वारे भव्य शिवजयंती उत्सव नेहरूनगर पिंपरी न्यायालयात साजरी करण्यात आली.

शिवजयंती निमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ रणरागिनी युद्ध कला प्रशिक्षक संस्कृती संवर्धन संस्था यांच्याद्वारे सादर करण्यात आले तसेच चित्रकला स्पर्धा ही घेण्यात आली त्यानंतर वकील बार रूम येथे शिवव्याख्याते ह.भ.प. अशोक महाराज पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्रावरील व्याख्यान घेण्यात आले तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिरवणुकित चालता चालता छत्रपती शिवाजी महाराजांची विविध सुबक चित्र रेखाटण्यात आली यावेळी पिंपरी चिंचवड न्यायालयाचे मे. न्यायाधीश आर. एम. गिरी साहेब उपस्थित होते.

तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ॲड. दिनकर बारणे  होते व प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुभाष चिंचवडे  हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले सर व कार्यकारिणी यांनी केले होते. यावेळी माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. सतीश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. मदनलाल छाजेड, ॲड. सचिन थोपटे, ॲड. किरण पवार, ॲड. सुदाम साने, ॲड. गोरखनाथ झोळ, तसेच माजी उपाध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. राजरत्न जाधव, ॲड. नितीन क्षीरसागर, ॲड. गोरक्ष लोखंडे, ॲड.प्रसन्न लोखंडे, ॲड. सारिका परदेशी, ॲड. सुजाता बिडकर, ॲड. सारिका भोसले, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड.विवेक राऊत, ॲड. मानसी उदासी, ॲड. आकाश फुरडे, ॲड. सनी काटे, ॲड.रिना मगदुम , ॲड.विद्यालता कमलेकर,ॲड. निलेश टिळेकर, ॲड. प्रतीक्षा जाधव, ॲड. बालाजी देशमुख, ॲड. अनिल पवार,ॲड. शुभम खैरनार, ॲड. संकेत गराडे, ॲड. अक्षय गादेकर, ॲड. पूजा बदे, ॲड. अजिंक्य लोमटे, ॲड. असावरी फडके, उपस्थित होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले उपाध्यक्ष ॲड. प्रतिक्षा खिलारी, सचिव ॲड धनजंय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड.मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड, अजित खराडे, हिशोब तपासणीस ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड.अस्मिता पिंगळे ॲड.दशरथ बावकर, ॲड. मीनल दर्शिले, ॲड अय्याज शेख, ॲड फारुख शेख.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे पिंपरी चिंचवड ॲड बार असोसएशनचे सचिव ॲड.धनंजय कोकणे यांनी केले व आभार हे ॲड.आय्याज शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button